जगभरात अशी अनेक ठिकाणं आहेत जिथे आजही महिला आणि मुलींबद्दल समाजाचा विचार अतिशय घृणास्पद आहे. केवळ भारतच नव्हे, तर अनेक देश असे आहेत की, जिथे अनेक क्षेत्रांतील सामाजिक कुप्रथा धक्कादायक आहेत. चीनमधून एक प्रकरण समोर आलं आहे, ज्यात एका महिलेला पाच तास व्हर्जिनिटी टेस्ट द्यावी लागल्याची माहिती समोर आली आहे.
वास्तविक, हे प्रकरण पूर्व चीनच्या जिआंग्सी प्रांतातील आहे. साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या रिपोर्टनुसार, लग्नानंतर जेव्हा एक मुलगी सासरी पोहोचली तेव्हा तिला अनवाणी पायांनी घराच्या जमिनीला स्पर्श करू दिला नाही.
या आधी विधी करण्यात येईल, असे सांगण्यात आले. हा विधीही अतिशय विचित्र होता. हा विधी केल्यानंतरच नववधूचा पाय सासरच्या भूमीवर पडेल, असे सांगण्यात आले.
असे केल्याने वधूची कौमार्य चाचणी होऊन तिची सर्व वाईट कृत्ये चांगल्यात परिवर्तीत होतील, असे सांगण्यात आले. ती स्वत: सासरच्यांसाठी भाग्यवान सिद्ध होईल आणि त्यांचा विकास होईल.
या विधीमध्ये नवरीला एका टोपलीत पाच तास अनवाणी पायाने बसावे लागले, त्यात तिच्या पायाचा जमिनीवर स्पर्श झाला नाही. हे सगळं न थांबता, न थकता करावं लागलं. असं करणं खूप गरजेचं आहे, असंही वधूला सांगण्यात आलं.
साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या या रिपोर्टमध्ये वधूचे काही फोटोही समोर आले आहेत. असे करताना त्याला किती त्रास होत आहे, हे यातून दिसून येते. हे फोटो पाहून लोक संतापलेत. चीनच्या अनेक भागात आजही वधूसाठी अनेक विचित्र विधी करावे लागल्याच्या घटना घडल्याचे कळते.