वधू-वरांचे सर्व व्हिडिओ तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असतील. पण केरळच्या लग्नाची ही क्लिप जेव्हा लोकांनी पाहिली, तेव्हा लोकांनी या व्हिडिओला डोक्यावर घेतलं. या व्हिडीओमध्ये एक नवरी स्वत:च्या लग्नात मोठ्या उत्साहात ‘ढोल’ वाजवताना दिसत आहे. खरं तर, मुलीचे वडील एक व्यावसायिक चेंदा मास्टर आहेत. चेंदा म्हणजे एक वाद्य असतं ज्याची सुपारी घेऊन तिचे वडील ते कार्यक्रमात, समारंभात वाजवायला जातात. या कामात तरुणी सुद्धा प्रोफेशनल आहे. त्यामुळे साहजिकच जेव्हा तिचं लग्न होतं तेव्हा शिंकारी मेलम आर्टिस्टसोबत चेंदा वाजवत होती, तेव्हा कुणीतरी व्हिडिओ बनवला आणि हे प्रकरण व्हायरल झालं. सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे जेव्हा मुलगी चेंदा वाजवत असते तेव्हा नवरदेवही तिला पाठिंबा देत असतो.
व्हायरल क्लिपमध्ये एक तरुणी बिंदास चेंदा वाजवताना दिसत आहे. या काळात त्याच्या आनंदाला आणि उत्साहाला अंत नसतो.
केरळमधील लग्नसमारंभांमध्ये अशी वाद्य वाजवणे खूप सामान्य आहे. पण नववधूची अशी स्टाइल क्वचितच पाहायला मिळते.
मीडिया रिपोर्टनुसार, शिल्पा असं या वधूचं नाव असून तिचे वडील व्यवसायाने चेंदा मास्टर आहेत. तो कन्नूर (केरळ) येथील रहिवासी आहे. हे वाद्य वाजवण्यातही मुलगी प्रोफेशनल आहे. तिने आपल्या लग्नात चेंदा वाजवायला सुरुवात केली, हा व्हिडिओ व्हायरल झाला. रविवारी शिल्पाने राजवलसम सभागृहात देवानंद नावाच्या तरुणाशी लग्न केलं.
चेंदा हा लाकडापासून बनवलेला पोकळ दंडगोलाकार ड्रम आहे. दोन्ही बाजूची तोंडं जाड चर्मपत्रांनी झाकलेली असतात. जाड लवचिक चामड्याच्या खोडांनी टोकाला बांधलेली असतात.
चेंदा कमरेच्या खाली टांगलेला असतो आणि दोन वक्राकार लाकडी काठ्यांनी हे वाद्य वाजवलं जातं. हे मूलत: केरळच्या कथकली नृत्याशी सुसंगत आहे. इतकंच नाही तर मंदिरातील विधी, लग्नसमारंभ अशा खास प्रसंगीही याचा वापर केला जातो.
A marriage function in guruvayoor temple today. The brides dad is Chendai master and the daughter plays it enthusiastically with her dad also joining at the end. The groom also seems to be participating. pic.twitter.com/VgoQbIhwhh
— BRC-SBC (@LHBCoach) December 26, 2022