शाहरुख खानच्या ‘ओम शांती ओम’ या चित्रपटात एक डायलॉग आहे, ‘मनापासून एखादी गोष्ट हवी असेल तर संपूर्ण विश्व तुम्हाला ती गोष्ट मिळवून देण्यात मदत करतं”. संवाद फिल्मी आहे, पण या गोष्टी कधी कधी खऱ्या आयुष्यातही फिट्ट बसताना दिसतात. याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे रेग पाय. रेग अलीकडेच 78 वर्षांनंतर त्या फ्रेंच मुलीला भेटला, जिचा फोटो त्याने पाकिटात ठेवलेला होता. दोघांची पहिली भेट दुसऱ्या महायुद्धादरम्यान झाली होती.
संपूर्ण जग दुसऱ्या महायुद्धाच्या विळख्यात असताना या कथेची सुरुवात होते. 1944 साली ब्रिटिश सैनिक रेग पाय हे फ्रान्स रे नॉर्मंडी बीचजवळ आपल्या तुकडीसह तैनात होते. तेव्हा त्यांच्याजवळ एक व्हॅन थांबली. एका तरुणाने रेग आणि त्याच्या साथीदारांना पिलचार्ड (मासे) आणि मार्गरीन आणि लाल जॅम लावून ब्रेड दिला.
ते घेतल्यानंतर रेग थोडा पुढे गेला, त्याला समोर एक मुलगी उभी असलेली दिसली. ती माझ्याकडे रोखून बघत राहिली. मी तिला ब्रेड देण्यासाठी हात पुढे केला. मुलीने ब्रेड घेतला की नाही हे रेगला आठवत नाही, पण तो म्हणतो की ती त्यानंतर चर्चमध्ये पळून गेली होती.
ही मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून तीच ह्यूगेट होती. रेग म्हणतो की, पहिल्या भेटीनंतर दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा मी त्याच ठिकाणी पोहोचलो, तेव्हा सर्व सामान तिथे विखुरले गेले होते. तिथे मला एका मुलीचा फोटो दिसला. जेव्हा त्याने तो उचलला, तेव्हा तो त्याच ह्यूगेटचा होता जो आदल्या दिवशी भेटला होता. त्यानंतर त्याने ह्यूगेटचा फोटो आपल्या पाकिटात ठेवला. तो ह्यूगेटला कधीच भेटला नाही.
गेल्या 78 वर्षांपासून रेग ह्यूगेटला पुन्हा एकदा भेटण्याचे स्वप्न पाहत आहेत. 2015 नंतर रेगने आपल्या मुलाच्या मदतीने ह्यूगेटला शोधण्याचा प्रयत्न सुरू केला. रेग 78 वर्षीय ह्यूगेट यांना भेटले तेव्हा त्यांनी आपला धूसर फोटो समोर ठेवला.
हा फोटो बघून तिला आश्चर्य वाटलं. रेग म्हणाले हा फोटो माझ्याकडे गेली 78 वर्षे आहे. पहिली भेट आठवून रेगने आपल्याबरोबर पिलचर्ड आणि ब्रेड आणला. ब्रेडवर जॅम होता. त्याने ह्यूगेटला तो ब्रेड दिला. पण ह्यूगेटनेही पहिल्या भेटीप्रमाणेच या वेळीही ते घेण्यास नकार दिला.
ह्यूगेट भावूक झाला होती की, जरी तो तिला फक्त एकदाच भेटला होता तरी इतक्या वर्षांनंतरही रेग तिला शोधत राहिला. या भेटीनंतर दोघांनीही एकमेकांना मिठी मारली. ह्यूगेट हसली आणि म्हणाली की, आता आपल्याला लग्न करावे लागेल आणि रेग लग्नासाठी तयार झाला.