Marathi News Trending Burger didn’t go bad even after being kept in a closed cupboard for five years; know the what the experts say about this.
आश्चर्य! पाच वर्ष बंद कपाटात ठेवून देखील बर्गर खराब झाले नाही; जाणून घ्या याबाबत तज्ज्ञ काय म्हणतात?
अमेरिकेच्या वॉशिंग्टनमधून एक विचित्र प्रकार समोर आला आहे. एका महिलेने पाच वर्षांपूर्वी आपल्या घराच्या कपाटामध्ये एक मॅक्डोनल्डसचे बर्गर ठेवले होते. जेव्हा या महिलेने पाच वर्षांनंतर हे कपाट उघडले तेव्हा तिला ते बर्गर त्याच स्थितीमध्ये आढळून आले. या बर्गरमध्ये कोणताही बदल झालेला नव्हता हे बर्गर सडले किंवा खराब झाले नव्हते.
1 / 5
अमेरिकेच्या वॉशिंग्टनमधून एक विचित्र प्रकार समोर आला आहे. एका महिलेने पाच वर्षांपूर्वी आपल्या घराच्या कपाटामध्ये एक मॅक्डोनल्डसचे बर्गर ठेवले होते. जेव्हा या महिलेने पाच वर्षांनंतर हे कपाट उघडले तेव्हा तिला ते बर्गर त्याच स्थितीमध्ये आढळून आले. या बर्गरमध्ये कोणताही बदल झालेला नव्हता हे बर्गर सडले किंवा खराब झाले नव्हते. त्याच्या रंगात देखील कोणताही बदल झालेला नव्हता. मेगन कॉन्ड्री असे या महिलेचे नाव आहे.
2 / 5
न्यूयॉर्क पोस्टने दिलेल्या माहितीनुसार मेगनने असा दावा केला आहे की, तिने पाच वर्षापूर्वी एक चीज बर्गर खरेदी केले होते. तीने हे बर्गर एका कपाटामध्ये ठेवले होते. त्यानंतर ती विसरून गेली. तीने जेव्हा पाच वर्षानंतर हे कपाट उघडले तेव्हा कपाटामध्ये तीला बर्गर आढळून आले. चीज बर्गर लगेच खराब होते. मात्र हे बर्गर पाच वर्ष तसेच राहिल्याचे तिने म्हटले आहे.
3 / 5
मेगनने म्हटले आहे की, हे बर्गर बाहेरून खराब झालेले नाही, त्याच्यात कोणतेच बदल झाले नाही. मात्र आतील भाग मात्र कडक झाला तो इतका कडक झाला आहे की, जर हे बर्गर एखाद्या काचेच्या खिडकीला फेकून मारले तर ती काच तुटू शकते. दरम्यान यावर बोलताना मॅक्डोनल्डसने असे म्हटले आहे की, असं होण्याची ही पहिलीच वेळ नाहीये. यापूर्वी देखील अशा घटना घडल्या आहेत. जर तुमच्या घरातील वातावरण दमट नसेल तर बर्गरमध्ये विषाणू शिरकाव करत नाही आणि बर्गर आहे त्याच स्थितीमध्ये अनेक दिवस राहाते.
4 / 5
आयएफएल सायन्सच्या रिपोर्टनुसार कोणतेही अन्नपदार्थ खराब होण्यासाठी आद्रता कारणीभूत असते. जर तुमच्या घराचे वातावरण दमट असेल तर अन्नपदार्थांमध्ये जीवाणू लगेच प्रवेश करतात. मात्र जर तुमच्या घरचे वातावरण हे स्वच्छ आणि आद्रताविरहीत असेल तर जिवाणू लवकर अन्नपदार्थांमध्ये प्रवेश करत नाहीत. त्यामुळे अन्नपदार्थ दीर्घकाळ चांगले राहू शकतात.
5 / 5
दरम्यान हे बर्गर आतून कडक कसे झाले, त्यावर बोलताना आयएफएल सायन्सच्या वतीने सांगण्यात आले की, जेव्हा तुम्ही एखादी खाण्याची वस्तू ज्या ठिकाणी आद्रता किंवा दमट वातावरण नाही अशा ठिकाणी ठेवता. तेव्हा त्याच्यामध्ये बॅक्टेरिया प्रवेश करत नाहीत. ती वस्तू हळूहळू वाळण्यास सुरुवात होते. या वस्तूंचा बाहेरील भाग आहे तसाच राहातो मात्र आतील भाग कडक होतो.