उद्योगपती आनंद महिंद्रा ट्विटर खूप एक्टीव्ह आहेत, ते दररोज त्यांच्या ट्विटर अकाउंटवर काही ना काही व्हिडिओ किंवा पोस्ट शेअर करत असतात. त्याच्या काही पोस्ट मजेदार तर काही प्रेरणादायी आहेत. आता सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर अकाउंटवर जी पोस्ट व्हायरल होत आहे, त्यात एक पक्षी दोन रेल्वे रुळाच्या मध्यभागी घरटं करुन बसलेला दिसत आहे. त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असून लोक त्यांच्या प्रतिक्रियाही शेअर करत आहेत. (Business Man Anand mahindra tweet a photo of bird at railway line)
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा फोटो आनंद महिंद्रा यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. फोटो शेअर करताना त्याने कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, ते वाचून तुम्ही विचार करायला भाग पडाल. त्यांनी फोटोसोबत लिहिले – एक आई न शिकताही गणित, भौतिकशास्त्र आणि रेल्वे अभियांत्रिकीमध्ये पदवी घेऊ शकते.
पाहा व्हायरल होत असलेला फोटो-
She is now in worldwide demand by Corporations for the role of Chief Risk Officer… pic.twitter.com/5y7becD6ZO
— anand mahindra (@anandmahindra) November 23, 2021
हे कॅप्शन वाचल्यानंतर आनंद महिंद्रा किती बिझनेस माइंडेड आहेत याचा अंदाज येतो. लोकांना हे चित्र खूप आवडले आहे. आतापर्यंत या फोटोला हजारो लाईक्स आणि व्ह्यूज आले आहेत, तर 2000 हून अधिक लोकांनी रिट्विट केले आहे. त्यांच्या या पोस्टवर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. आम्ही तुम्हाला सांगतो की, आनंद त्याच्या सोशल मीडियावर जे काही पोस्ट करतात, ते व्हायरल होणारच हे फिक्स आहे. हा फोटो सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
आनंद महिंद्रांचा जुना फोटो:
Remembering the best weekends of my youth. In ‘72 -I was 17-a friend & I used to often hitchhike from ‘Bombay’ to ‘Poona’ taking rides on trucks. That’s probably when I developed my love for the open road..The movie ‘Parichay’ had come out & we would sing “Musafir hoon Yaaron’? pic.twitter.com/VuTvMTyivd
— anand mahindra (@anandmahindra) November 13, 2021
यापूर्वी उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी स्वतःचा एक फोटो शेअर केला होता, ज्यामध्ये ते 17 वर्षांचे दिसत होते. त्याचा ब्लॅक अँड व्हाइट फोटो शेअर करत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘तरुणपणातील सर्वोत्तम वीकेंड आठवतोय. 1972 मध्ये मी 17 वर्षांचा होतो. मी आणि माझा एक मित्र अनेकदा ‘मुंबई’ ते ‘पुणे’ ला ट्रकने प्रवास करायचो. कदाचित तेव्हाच मी मोकळ्या रस्त्यांच्या प्रेमात पडलो. त्यावेळी बॉलिवूडचा ‘परिचय’ चित्रपट आला होता आणि आम्ही ‘मुसाफिर हूं यारों’ गाणं म्हणायचो.
हेही पाहा: