जग गोल आहे. आणि या जगाचा इतिहास कोटी, अब्जो साल जुना आहे. या जगातील अनेक रहस्य अजून खुले झालेले नाहीत. हे जग रहस्यमय गोष्टींनी भरलेलं आहे. काही रहस्य अंगाचा थरकाप उडवणारे आहेत. तर काही रहस्य आश्चर्याचा धक्का देणारे आहेत. असेच एक आश्चर्यकारक रहस्य सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सुमारे 440 पूर्वी म्हणजे 1582मध्ये जगात एका महिन्यात 10 दिवस कमी होते. तो महिना होता ऑक्टोबरचा. सोशल मीडियावर 1582मधील ऑक्टोबर महिन्याचं एक कॅलेंडर व्हायरल झालं आहे. एका इन्स्टाग्रामरने त्याच्या रहस्यावर भाष्य केलं आहे. हा व्हायरल व्हिडीओ असला तरी यातील ही गोष्ट अत्यंत रोचक आहे.
इंस्टाग्रामवर @real_ruths नावाच्या अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. आजची तारीख चुकीची आहे, असं नाव या व्हिडीओला दिलेलं आहे. 1582 पासून ते आतापर्यंतच्या ज्या काही तारखा आहेत, त्यात 10 दिवस कमी आहेत. आपण सर्वजण 11 दिवस आधी पुढे आहोत. मी त्याचा तुम्हाला पुरावा देऊ शकतो, असं हा इन्स्टाग्रामर म्हणाताना दिसतोय. जर तुम्ही तुमच्या मोबाईलमधील कॅलेंडर उघडले तर 1582च्या ऑक्टोबर महिन्याला पाहून थक्क व्हाल. या कॅलेंडरमध्ये 4 ऑक्टोबरनंतर थेट 15 ऑक्टोबर ही तारीख दाखवण्यात आली आहे. त्यातील 10 दिवस एकदम गायब झाले आहेत. हे 10 दिवस कुठे गेले मला माहीत नाही. पण तुम्हाला वाटलं तर तुम्ही कॅलेंडर चेक करू शकता, असं हा इन्स्टाग्रामर म्हणतोय.
तुम्ही मोबाईलमधील कॅलेंडर चेक कराल तर 1582 या वर्षात जाल तर ऑक्टोबर महिन्यातील 4 तारखेनंतर थेट 15 ऑक्टोबरची तारीख दाखवली आहे. याचं कारण कुणाला माहीत नाही. पण या काळात जगभरात ग्रेगोरियन कॅलेंडरचा वापर केला जात होता. हे कॅलेंडर 1582मध्ये पोप ग्रेगोरी-8 यांच्या नावाने तयार करण्यात आलं होतं. तर 1582मध्ये ज्युलिअस सीझरच्या नावाने ज्यूलियन कॅलेंडर बनवण्यात आलं होतं. त्यावेळी चार वर्षात एक लीप ईयर होतं. त्यावेळी पृथ्वीच्या भ्रमणाची जी तुलना केली जात होती, त्या हिशोबाने कॅलेंडरमध्ये 10 दिवस अधिकचे जोडले जात होते. कॅलेंडरमधील ही कमतरता हटवण्यासाठी ग्रेगोरियन कॅलेंडर बनवण्यात आलं. पोप ग्रेगोरी यांनी जेव्हा नवीन कॅलेंडर तयार केलं, तेव्हा त्यांनी या कॅलेंडरमधील 10 दिवस कमी केले. त्यामुळेच 4 ऑक्टोबर नंतर थेट 15 ऑक्टोबर दाखवण्यात आले आहेत.
realt_ruths नावाच्या अकाऊंटवर हा हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत 11.7 मिलियनहून अधिक लोकांनी पाहिलं आहे. तर 5 लाख 24 हजार वेळा या व्हिडीओला लाइक करण्यात आलं आहे. या व्हिडीओवर यूजर्समध्ये एकमत नाहीये. यूजर्स आपआपली विविध मते व्यक्त करताना दिसत आहेत. ग्रेगोरियन कॅलेंडरमध्ये सुधारणा करायची होती. म्हणून 1582 मध्ये 10 दिवस कमी करण्यात आले होते, असं एकाने म्हटलंय. तर ही त्यावेळची चूक आहे. फार गांभीर्याने घेऊ नये, असा सल्ला एका यूजर्सने दिला आहे. तर हे कॅलेंडर ग्लिच आहे. फार विचार करू नका, असं एकाने म्हटलं आहे.