हे एक वेगळ्या प्रकारचा ऑप्टिकल भ्रम आहे कारण यात मुलगी बेडरूममध्ये झोपलेली आहे आणि या बेडरूममध्ये तुम्हाला लपलेला बेडूक शोधायचा आहे. बेडूक अचानक दिसत नाहीत आणि ऑप्टिकल भ्रमांचा गुण असा आहे की ते आपल्या डोळ्यांना आणि डोक्याला गोंधळून देण्यासाठी ओळखले जातात. असंच हे चित्र आहे. कितीही शोधा प्रथमदर्शनी हा बेडूक दिसतच नाही. खूप डोकं हे कोडं सोडवताना लावावं लागतं.
खरंतर हा एक अत्यंत मजेशीर फोटो आहे कारण बेडूक पाहून तुमच्या चेहऱ्यावर हसू येईल. यात घराच्या बेडरूममध्ये एक मुलगी आपल्या टेडी बिअरसोबत झोपलेली दिसत असून त्यात बरीच खेळणी पडलेली आहे, त्यात इतरही काही गोष्टी पडून आहेत आणि दरम्यान एक बेडूक लपलेला आहे. चित्रात हा बेडूक शोधून तो कुठे आहे हे तुम्हाला सांगायचंय.
या बेडरुममध्ये अनेक वस्तू व्यवस्थित ठेवल्या आहेत. पण काही वस्तू इकडे तिकडे पडूनही आहेत. या सगळ्या गोष्टींमुळेच तो बेडूक त्यात दिसत नाही. पण जर तुम्हाला हा बेडूक सापडला तर तुम्हाला प्रतिभावंत म्हटले जाईल.
खरं तर या चित्रात हा बेडूक वरच्या भिंतीवर टांगलेल्या पेंटिंगमध्ये दिसत आहे. चित्राच्या वरच्या उजव्या बाजूला असलेल्या हिरव्या रंगाच्या पेंटिंगमध्ये बेडूकाचा हसतमुख चेहरा दिसतो. नीट पाहिल्यावर बेडूक कुठे आहे हे कळते. तरीही जर दिसला नसेल तर खाली आम्ही उत्तर सांगत आहोत.