Optical Illusion सांगा बरं हृदय कुठाय? तुमचं नाही, चित्रात लपलेलं!

| Updated on: Jan 11, 2023 | 1:22 PM

आता तुम्हाला ते हृदय 10 सेकंदात शोधावे लागेल. डुडास ऑप्टिकल इल्यूजन्समध्ये बनवण्यात माहिर आहे.

Optical Illusion सांगा बरं हृदय कुठाय? तुमचं नाही, चित्रात लपलेलं!
Find the heart
Image Credit source: Social Media
Follow us on

ऑप्टिकल इल्युजन पिक्चर्सचे रहस्य सोडवणे हा आजकाल इंटरनेट वापरकर्त्यांचा आवडता खेळ बनला आहे. अभ्यासातून असे दिसून आले आहे की ऑप्टिकल भ्रम आपले डोळे तीक्ष्ण करून आपले निरीक्षण कौशल्य वाढवू शकतात. आज आम्ही तुमच्यासाठी अशीच एक रंजक ऑप्टिकल इल्युजन टेस्ट घेऊन आलो आहोत , ज्यामध्ये हृदय कुठेतरी दडलेले आहे. आता आव्हान आहे, तुम्ही दडलेले हृदय 10 सेकंदात शोधू शकाल का?

तुम्ही बघू शकता की या चित्रात अनेक हत्ती आहेत आणि ते सर्व वेगवेगळ्या रंगाचे आहेत. काही हत्ती गडद गुलाबी तर काही जांभळ्या, हलक्या गुलाबी आणि पांढर्‍या रंगाचे आहेत. पण या ऑप्टिकल इल्युजनची रचना करणारे प्रसिद्ध हंगेरियन चित्रकार गेर्गेली डुडास यांनी चतुराईने हृदय कुठेतरी लपवून ठेवले आहे.

आता तुम्हाला ते हृदय 10 सेकंदात सांगावे लागेल. डुडास ऑप्टिकल इल्यूजन्समध्ये बनवण्यात माहिर आहे. त्यांनी काढलेले फोटो पाहून भल्या भल्या भल्या लोकांनाही घाम फुटतो. तर तुम्ही हे आव्हान स्वीकारण्यासाठी तयार आहात का?

आता वरील चित्र काळजीपूर्वक पहा. चित्रात तुम्हाला एक हत्ती त्याच्या सोंडेसह केळी वर उचलताना दिसेल. लपलेले हृदय शोधण्यासाठी आम्ही तुम्हाला थोडी मदत करू. जर तुम्ही चित्र नीट पाहिलंत तर कदाचित तुम्हाला लपलेले हृदय देखील दिसेल. जर तुम्हाला दिलेल्या वेळेत हृदय सापडले तर तुम्ही चांगले निरीक्षक आहात.

आम्हाला वाटते की तुमच्यापैकी अनेकांना दडलेले हृदय सापडले असेल. दुसरीकडे, ज्यांना असे वाटते की दिलेल्या इशाऱ्यानंतरही त्यांना हृदय सापडले नाही, त्यांनी जास्त काळजी करण्याची गरज नाही. तुमच्यासाठी, आम्ही खाली काउंटर चित्र देखील शेअर करत आहोत. काळ्या वर्तुळात दडलेले हृदय आम्ही दाखवले आहे.

here is the heart