मुंबई : ज्वालामुखीचा उद्रेक (Volcanic Eruption) खूप भयावह असते आतून बाहेर पडणाऱ्या लाव्हात अडकल्यानंतर कोणालाही जिवंत राहणे अशक्य आहे. अलीकडेच, स्पेनच्या कॅनरी बेटांमध्ये (Canary Island) ज्वालामुखीचा उद्रेक झाला. यामधून अजूनही लाव्हा बाहेर येत आहे. स्फोट होण्यापूर्वीच परिसरातील लोकांना तेथून हलवण्यात आलं होतं. आता या ज्वालामुखीजवळ अडकलेल्या कुत्र्याला वाचवण्याचे काम सुरु आहे. हा कुत्रा ज्वालामुखीच्या तोंडाजवळ अडकला आहे.
या कुत्र्याच्या बचावासाठी स्पॅनिश कंपनीने एक योजना बनवली आहे. या कुत्र्याची ड्रोनद्वारे सुटका केली जाईल. ड्रोनद्वारे प्राण्याला वाचवण्याची ही पहिलीच घटना असेल. संपूर्ण परिसर आधीच रिकामा करण्यात आला होता. पण, हा कुत्रा ज्वालामुखीजवळ अडकला. ज्वालामुखीमधून सतत लाव्हा बाहेर पडत आहे. तसेच, ते आता थांबण्याची शक्यताही नाही. अशा स्थितीत आता कुत्र्याला ड्रोनद्वारे वाचवले जाईल.
कुत्र्याला वाचवण्यासाठी हेलिकॉप्टरचा वापर करता आला असता. पण, त्यातून निघणारा धूर आणि गरम मॅग्मा यामुळे हेलिकॉप्टर त्याच्या जवळ जाऊ शकत नाही. यामुळे, आता एरोकॅमरस नावाच्या ड्रोन ऑपरेटरने आपल्या ड्रोनद्वारे कुत्र्याला वाचवण्याची योजना बनवली आहे. आता स्थानिक प्राधिकरणाकडून ही योजना मंजूर करण्यास विलंब होत आहे. पण, तज्ज्ञांचे म्हणणे आहे की ही बचाव योजना देखील अयशस्वी होऊ शकते, जर ड्रोनची बॅटरी संपली तर हे ऑपरेशन अयशस्वी होईल.
A Spanish drone operator received permission to try to rescue three emaciated dogs trapped near a volcano in the Canary Islands, by catching them with a remote-controlled net and flying them out over a stream of lava https://t.co/WCqadr4IfJ 1/5 pic.twitter.com/oqy2WGI6gb
— Reuters (@Reuters) October 19, 2021
संबंधित बातम्या :
Video: कुत्र्याच्या भुंकण्यावर सरडा चिडला, त्यानंतर जे झालं, त्याने नेटकरी पोट धरुन हसले!
Video: हत्ती आणि मगरीची लढाई, पाहा कोण पडले कुणावर भारी, अंगावर शहारे आणणारा व्हिडीओ!
Video: घराबाहेर ठेवलेला भोपळा अस्वलाने खाल्ला, व्हिडीओ पाहून नेटकरी खूश