“निरोप घ्यायची वेळ आलीये…”, Cancer पेशंटचं शेवटचं ट्विट! भावूक करणारी Viral Post…

| Updated on: Dec 20, 2022 | 6:04 PM

तो गेल्या 2 वर्षांपासून कर्करोगाशी लढा देत आहे, परंतु आता त्याच्या आयुष्यातील काही दिवसच उरले आहेत.

निरोप घ्यायची वेळ आलीये..., Cancer पेशंटचं शेवटचं ट्विट! भावूक करणारी Viral Post...
Cancer patient last tweet
Image Credit source: Social Media
Follow us on

कर्करोग हा एक असा आजार आहे जो हळूहळू शरीराला पोकळ बनवतो. या असाध्य रोगामुळे होणारा मृत्यू अत्यंत वेदनादायी असतो. पण त्याचे मूळ प्राथमिक अवस्थेत कळले तर त्याचाही पराभव होऊ शकतो. दरम्यान, कॅन्सरशी झुंज देत असलेल्या मार्क स्टोक्स नावाच्या ब्रिटिश शास्त्रज्ञाने सोशल मीडियाच्या माध्यमातून अखेरचा निरोप दिला आहे. या व्यक्तीने आपल्या पोस्टमध्ये अशा गोष्टी लिहिल्या आहेत, ज्या वाचून लोक भावूक झाले आहेत.

ऑक्सफर्ड विद्यापीठातील न्यूरोसायन्सचे प्राध्यापक मार्क स्टोक्स यांनी आपण कॅन्सरशी झुंज देत असून, आपल्याला जगण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक असल्याचे ट्विटरवरून आपल्या फॉलोअर्सना सांगून धक्का दिला.

मार्क स्टोक्सने रविवारी ट्विट केले की, ‘हाय फ्रेंड्स, आता माझ्यावर निरोप घेण्याची वेळ आली आहे. मी फक्त ट्विटर सोडण्याबद्दल बोलत नाही, तर या जगाचा निरोप घेत आहे.”

त्याने आपल्या चाहत्यांना सांगितले की, तो गेल्या 2 वर्षांपासून कर्करोगाशी लढा देत आहे, परंतु आता त्याच्या आयुष्यातील काही दिवसच उरले आहेत.

यासोबतच मार्क स्टोक्सने लोकांचे आभार मानत लिहिले आहे की, ‘मी मनात खूप प्रेम ठेवून या दुनियेला सोडून जात आहे.’

शास्त्रज्ञ मार्क स्टोक्स यांचे हे ट्विट व्हायरल झाले आहे. या पोस्टला 7.7 लाखांहून अधिक लाईक्स आणि 40 हजार रिट्विट मिळाले आहेत.

याशिवाय शेकडो लोकांनी कमेंट्स केल्या आहेत. अमेरिकन पत्रकार केटी कॉरिक यांनी लिहिले आहे की, “आम्हाला आमच्या सामान्य मानवतेची आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला शांती आणि मुक्तीच्या शुभेच्छा,”