Flying car video : सोशल मीडियाला व्हायरल व्हिडिओचे व्यासपीठदेखील म्हटले जाते. दररोज कोणत्या ना कोणत्या कारणाने व्हिडिओ व्हायरल होत असतो. असे काही व्हिडिओ आहेत जे पाहिल्यानंतर तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. असे व्हिडिओ तुम्ही पुन्हा पुन्हा पाहतात, पण बहुतांश व्हिडिओ एडिटही केलेले असतात. जे तुम्हाला अनेक वेळा पाहिल्यानंतर समजेल, की हा व्हिडिओ एडिट करण्यात आला आहे. एक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) खूप चर्चेत आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती रस्त्यावर कार (Car) चालवत आहे. काही अंतर गेल्यावर गाडी हवेत उडू (Flying)लागते. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती रस्त्यावर कारमध्ये बसलेला दिसत आहे. मग दुसरा ड्रायव्हर येतो आणि त्यांच्यात काही संवाद होतो. लाल रंगाच्या कारमधील व्यक्ती नंतर कार चालवते आणि थोड्या अंतरानंतर दरवाजा पंखा म्हणून वापरते. गाडी पक्ष्यासारखी हवेत उडू लागते.
इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर
हा व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रत्येकजण आश्चर्यचकित होत आहे, कारण हे कसे शक्य आहे याचे उत्तर कोणाकडेच नाही. प्रसिद्ध संगीतकार सायरस डोबरे हे कार चालवत आहेत. हा व्हिडिओ त्यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. जेव्हा यूझर्सनी हा व्हिडिओ पाहिला तेव्हा त्यांचाही यावर विश्वास बसला नाही. बहुतेक यूझर्सना हे समजले, की हे केवळ व्हिडिओ संपादनाद्वारे केले गेले आहे, कारण प्रत्यक्षात ते कोणत्याही परिस्थितीत शक्य नाही.
‘Back to the future’
इंटरनेटवर व्हायरल झालेला हा व्हिडिओ cyrusdobre याने दोन दिवसांपूर्वी अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. आतापर्यंत 31 हजारांहून अधिक लोकांनी लाइक केले आहे. व्हिडिओ शेअर करण्यासोबतच ‘Back to the future‘ असे कॅप्शनमध्ये लिहिले आहे. आतापर्यंत हजारो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे आणि तो अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करत आहेत.
आणखी वाचा :