Heavy Rain: देशभरात यंदा मान्सून चांगला सुरु आहे. महाराष्ट्रातील अनेक भागांत पावसाने त्रेधातिरपीट उडवली आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मुंबईत सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. मुंबईत पावसामुळे रेल्वे ट्रॅकवर पाणी यंदा अनेकदा आले. त्याचा परिणाम रेल्वे सेवा ठप्प झाल्यावर दिसला. आता सोशल मीडियावर पावसाचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये रेल्वे पाण्यावरच धावत असल्यासारखे अप्रतिम दृश्य दिसत आहे. राजस्थानमधील बिकानेर येथील रेल्वेचे हे दृश्य सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे.
राजस्थानमधील अनेक भागांत पावसाने जोर धरला आहे. मागील 24 तासांत 15 मिमीपेक्षा जास्त पाऊस विकानेरमध्ये झाला आहे. या पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचले आहे. रेल्वे ट्रॅकही पाण्यात गेला आहे. पाणी भरण्याबरोबरच रेल्वे ट्रॅकही पाण्याखाली गेले आहेत. रेल्वे ट्रॅक पाण्यात बुडाल्याने रेल्वे पाण्यावर धावत असल्याचा भास होत असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हे अनोखे दृश्य शुक्रवारी बिकानेरमध्ये पहायला मिळाले. बिकानेरपासून 50 किलोमीटर अंतरावरील महर्षी कपिल यांची भूमी कोलायतच्या रेल्वे स्थानकावरील हे दृश्य आहे.
मुसळधार पावसामुळे पाण्याची पातळी वाढली. त्यामुळे रेल्वेचे रुळ पाण्यात गेले. त्या ठिकाणावरुन जाणाऱ्या गाड्या रेल्वे रुळावरील पाण्यावरून धावू लागल्या. अशीच परिस्थिती राजस्थानच्या टोंक जिल्ह्यात पाहायला मिळाली. मासी नदीला उधाण आले असून, त्यामुळे पिपळू ते बागडी रस्ता 3 फुटांपेक्षा जास्त पाण्यात गेला आहे.
After heavy rains a railway station near Bikaner, Rajasthan. pic.twitter.com/dhODvAX0C0
— Naveen Reddy (@navin_ankampali) August 3, 2024
सोशल मीडियावर हा व्हिडिओ नवीन रेड्डी यांनी शेअर केला आहे. त्या व्हिडिओला 48 हजारांपेक्षा जास्त लोकांनी पाहिले आहे. अनेकांनी लाईक आणि कॉमेंट केल्या आहेत. एकाने लिहिले हा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकू नको. अन्यथा दिल्ली पोलीस लोका पायलेटला अटक करतील. दुसरा म्हणतो, मुसळधार पावसात रेल्वे कशी चालवावी, याचे प्रशिक्षण सुरु असेल. काही जणांनी इतर ठिकाणी पडलेल्या अशा पावसाची माहिती दिली आहे.