नवी दिल्ली : मांजरी अनेकदा त्यांच्या खोडकरपणामुळे चर्चेचा विषय बनतात. म्हणूनच बरेच लोक त्यांच्यापासून दूर राहणेच पसंत करतात. कित्येक वेळा घरातील सर्व दूध प्यायल्यानंतर मांजरी गुपचूप पळून जातात. त्यामुळे लोक रागाने चिडचीड करतात. पण तुम्ही कधी मांजरीला प्रेमाने दुधासाठी विचारताना पाहिले आहे का? नाही ना, परंतु सध्या सोशल मीडियातील एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती गायीला दूध पाजत आहे. तिथे एक मांजरही बसलेली आहे. ती मांजर मोठ्या प्रेमाने दूध मागताना दिसते. (Cat attempts for milk; You too will laugh heartily after watching the video)
आता मांजरीच्या या गोंडस कृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप लोकप्रिय झाला आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये हे स्पष्ट दिसत आहे की ती व्यक्ती दूध काढण्यात व्यस्त आहे. पण मांजर दूध मिळेल या आशेने पुन्हापुन्हा त्या माणसाला स्पर्श करत राहते. खरंतर मांजर ही लाडीगोडी लावते, जेणेकरून तिलाही थोडे दूध मिळेल. मांजर दूध मागताना पाहून ती व्यक्ती दुधाचा प्रवाह थेट गाईच्या कासेवर शिंपडते. मांजरदेखील तोंड उघडते आणि सर्व दूध पिते.
हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट होताच लोकांनी आपल्या प्रतिक्रिया वेगाने नोंदवायला सुरुवात केली. कमेंट्स जणू पाऊसच पडला आहे. एका युजरने म्हटले आहे की प्रत्यक्षात मी पहिल्यांदाच अशाप्रकारे मांजरी पाहिली आहे. त्याचवेळी दुसर्या युजरने म्हटले आहे की माझा विश्वासच बसत नाही की मांजर प्रेमानेही दूध मागू शकते. कारण मी अनेकदा मांजरींना घरातले सर्व दूध गुपचूप पिताना पाहिले आहे. अशाप्रकारे मोठ्या प्रमाणावर मजेदार कमेंट्स नोंदवण्यात आल्या आहेत.
pindawaallejatt नावाच्या पेजवरून हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. लोकांना हा व्हिडिओ खूप आवडत आहे. म्हणूनच बऱ्याच लोकांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप वेगाने शेअर केला आहे. हा व्हिडिओ चार लाखांहून अधिकवेळा पाहिला गेला आहे. हा व्हिडीओ शेअर करून एक आठवडाही झालेला नाही, इतक्या कमी कालावधीत या व्हिडीओने भलतीच लोकप्रियता कमावली आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर बरेच लोक मांजरीला पाहून खूप हसत आहेत. चला तर मग तुम्हीही या मांजरीची गंमत पाहून पोटभरुन हसा. (Cat attempts for milk; You too will laugh heartily after watching the video)
मुंबईच्या महापौरपदासाठी काँग्रेसची मदार अभिनेते, सेलिब्रेटींवर? स्ट्रॅटेजी कमिटीचा अहवाल, तीन नावं चर्चेत#Mumbai #BMC #Congress #SonuSood https://t.co/hcKKgExlro
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 23, 2021
इतर बातम्या