Cat Video: आयुष्यात पहिल्यांदा मांजरीने शिस्त दाखविली, नळ चालू करून प्युरिफायरचं पाणी प्यायलं!

| Updated on: Aug 13, 2022 | 7:00 AM

कुत्र्यासारखं वागण्याची आशाच सोडली. तुम्हालाही असं वाटत असेल तर आता वेळ आली आहे ती विचार बदलण्याची. नेहमी नखरे करणारी मांजर इतकी समजूतदार झाली आहे की आपणच हा व्हिडीओ पाहिल्यानंतर आपल्यालाच तिच्याकडून काहीतरी शिकायची गरज आहे हे कळून येईल.

Cat Video: आयुष्यात पहिल्यांदा मांजरीने शिस्त दाखविली, नळ चालू करून प्युरिफायरचं पाणी प्यायलं!
Cat Video
Image Credit source: Social Media
Follow us on

घरात लाखो प्राणी उपस्थित असतात, पण माणसांच्या सर्वात जवळ असलेल्या प्राण्यांबद्दल बोलायचं झालं तर पहिलं नाव येतं ते कुत्र्या-मांजराचं. त्यांचे व्हिडिओ इंटरनेटवरही (Internet) खूप पसंत केले जातात. अनेकदा ते असं काही करतात की जे पाहून आपण आपल्या डोळ्यांवर विश्वास ठेवू शकत नाही. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Social Media Viral) होत आहे. जे पाहिल्यानंतर तुम्ही स्तब्ध व्हाल. आपल्या सर्वांना माहित आहे की कुत्री जगातील सर्वात बुद्धिमान आणि निष्ठावंत प्राण्यांमध्ये गणली जातात, परंतु मांजरी (Cats) इतक्या खोडकर आणि त्रास देत असतात की लोकांनी त्यांच्याकडून साधं सरळ वागण्याची, कुत्र्यासारखं वागण्याची आशाच सोडली. तुम्हालाही असं वाटत असेल तर आता वेळ आली आहे ती विचार बदलण्याची. नेहमी नखरे करणारी मांजर इतकी समजूतदार झाली आहे की आपणच हा व्हिडीओ पाहिल्यानंतर आपल्यालाच तिच्याकडून काहीतरी शिकायची गरज आहे हे कळून येईल.

पाहा व्हिडिओ

स्वत:हून प्युरिफायर चालू करून आपली तहान भागवते

हा व्हायरल व्हिडिओ एका घरातला वाटतोय, जिथे मांजर माणसांप्रमाणे पाणी पिऊन आपण किती समजूतदार आहोत हे दाखवत आहे. लोकांच्या दृष्टीने हट्टी आणि मनमानी म्हणवून घेणारी मांजर स्वत:हून प्युरिफायर चालू करून आपली तहान भागवते. ज्या शिस्तीची त्या मांजराकडून आजवर क्वचितच कोणी अपेक्षा केली असेल अशी शिस्त इथं हे मांजर दाखवतंय.

व्हिडिओ @buitengebieden नावाच्या अकाऊंटवरून ट्विटरवर शेअर

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये मांजराने आपली शिस्त दाखवत लोकांना आश्चर्यचकित केले. हा व्हिडिओ @buitengebieden नावाच्या अकाऊंटवरून ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला 77 लाखांहून अधिक व्ह्यूज आणि अडीच लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. एका युझरने या व्हिडिओवर कमेंट करत लिहिले की, ‘हे पाहून असे वाटते की, प्राण्यांनाही पाण्याची किंमत कळते.’