सोशल मीडियावर वाढदिवस वेगवेगळ्या पद्धीने साजरे केल्याचे अनेक व्हिडिओ दिवसेंदिवस व्हायरल होत असतात. मात्र आता एक वाढदिवसाचा असा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय जे पाहून तुम्हीलाही अभिमान वाटेल. सोशल मीडियावरील अनेक व्हिडिओ अनेकदा पुन्हा पुन्हा पाहण्याची इच्छा होते, त्यासाच हा व्हिडिओही तुम्ही पुन्हा पुन्हा पाहिल्याशिवाय राहणार नाही.
जवानाचा अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा
हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावर हसू खिळल्याशिवाय राहणार नाही. या व्हिडिओत भारतमातेच्या एका सैनिकाचा वाढदिवस साजरा होताना दिसून येत आहे. लोकांनी या व्हिडिओला प्रचंड पसंती दाखवली आहे. सोबतच या व्हिडिओवर लाईक आणि कमेंट्सचा पाऊस पडतोय. त्यामुळे या व्हिडिओची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे.
परेड करत जावानाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
सैन्यातील जवान आपल्या परिवारापासून आणि गावापासून बराच काळ दूर असतात. कधी मायनस डिग्री थंडीत देशाच्या सीमेवर सुरक्षा करत असतात. तर कधी 50 डिग्रीच्या कडाक्याच्या उन्हात बॉर्डवर पाहरा देत असतात. त्यांच्या नशिबी सणसुदही नसतात, त्यावेळी त्यांच्यासोबत असणारे जवान, त्यांचे मित्र हेच त्याच्यासाठी सर्वकाही असतात. अशाच एकाच जवानाच्या वाढदिवसादिवशी सैन्यातील जवानांनी आपल्या साथिदाराला परेड करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या व्हिडिओतील परेडचा आवाज ऐकूण कुणाच्याही अंगावर शहारे उभे राहतील, इतकी ऊर्जा या व्हिडिओतून मिळते. या व्हिडिओ कुठल्या आर्मी कॅम्पमधील आहे हे जरी कळू शकले नसले तरी, हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय आणि नेटकऱ्यांचीही त्याला चांगलीच पसंती मिळत आहे. हा व्हिडिओ पाहून प्रत्येक जवानाला वाटत असेल वाढदिवस साजरा व्हावा तर असा.