आपण अनेकदा भाजीपाला घेण्यासाठी बाजारात जातो, भाजी किंवा फळ घेताना ते आपण व्यवस्थित निवडून घेतो, जेणेकरुन खराब फळं वा भाजी आपल्याला मिळू नये. मात्र, एवढं करुनही बऱ्याचदा दुकानदार खराब मालच आपल्याला खपवतात. हातचलाखी करुन ते चांगल्या मालासोबत खराब माल मिक्स करुन टाकतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्या महिला दुकानदार हातचलाखी दाखवताना दिसते आहे. ( Cheating with a customer from a fruit seller woman. Remove the good fruit and fill the bag with bad fruit )
व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत एक महिला रस्त्यावर ठेला लावून फळ विकताना दिसते आहे. तिथं उभा असलेला ग्राहक तिला फळं निवडून प्लास्टिक बॅगमध्ये टाकून देतो, मात्र, तेवढ्यात ही महिला हातचलाखी करत, पिशवीतील चांगली फळं खराब फळांसोबत बदलते. इतक्या शातिरपणे ही हातचलाखी केली जाते की, बाजूला उभ्या असलेल्या कुणालाही तिचं हे कृत्य लक्षात येत नाही.
पाहा व्हिडीओ:
सोशल मीडियावर हा व्हिडीओ पाहून लोकांना आश्चर्याचा धक्का बसत आहे. आणि कमेंटमधून नेटकरी आपला राग व्यक्त करत आहे. एका युजरने लिहलं, या मावशींनी आपलं काम इतकं चालाखपणे केलं की तिथं कुणाच्याही लक्षात आल नाही. तर दुसऱ्याने लिहलं, पुढच्या वेळी मी भाजीपाला घेताना नजर कायम भाजीविक्रेत्यावरच ठेवणार आहे. याशिवाय, एकाने कमेंट केली की, याला काय म्हणायचं, हातचलाखी की गिऱ्हाईकासोबत धोका? याशिवाय अनेक लोकांनी राग व्यक्त केला.
तुमच्या माहितीसाठी, ही बातमी लिहीली जाईपर्यंत, या व्हिडीओला हजारो लोकांनी पाहिलं होतं, याशिवाय अनेकांनी वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर हा व्हिडीओ शेअरही केला होता. त्यामुळे तुम्हीही जेव्हा कुणाकडून काही विकत घेत असाल, तर वस्तू घेण्याआधी तपासूनच घ्या.सामान को खरीदने जाएं तो उनके साथ ऐसा धोखा ना हो जाएं.
हेही पाहा: