मुंबई : चित्त्याने (Cheetah) केलेल्या शिकारी आपण बरेच व्हीडिओ पाहतो. पण चित्त्याची शिकार होताना तुम्ही पाहिलीय का? हे कदाचित खरं वाटणार नाही. पण सध्या सोशल मीडियावर एक व्हीडिओ व्हायरल (viral video) होत आहे. यात चित्त्याची शिकार होताना दिसतेय. ही शिकार करत आहेत, रानडुक्कर. रानडुक्करांनी (wild boars) चित्त्याच्या केलेल्या शिकारीचा व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे. यात तीन रानडुक्करांनी चित्त्याची अक्षरश: चिरफाड केल्याचं दिसत आहे. ही घटना तामिळनाडूमधल्या पलानी ते कोडाईकनाल रोडवर घडली असल्याचं सांगण्यात येतंय. या व्हीडीओमधला बिबट्या एखाद्या अपघातात मरण पावला असेल, असा अंदाज वर्तवण्यात येतोय.
सध्या सोशल मीडियावर एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. यात चित्त्याची शिकार होताना दिसतेय. ही शिकार करत आहेत, रानडुक्कर. रानडुक्कराने चित्त्याच्या केलेल्या शिकारीचा व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे. यात तीन रानडुक्करांनी चित्त्याची अक्षरश: चिरफाड केल्याचं दिसत आहे. ही घटना तामिळनाडूमधल्या पलानी ते कोडाईकनाल रोडवर घडली असल्याचं सांगण्यात येतंय. या व्हीडीओमधला बिबट्या एखाद्या अपघातात मरण पावला असेल, असा अंदाज वर्तवण्यात येतोय.
हा व्हीडिओ WildLense_India या ट्विटर अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे. या व्हीडीओला 22 हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर अनेकांनी हा व्हीडिओ पाहून आपली प्रतिक्रिया दिली आहे. किती खतरनाक व्हीडिओ आहे, असं एकाने म्हटलंय. तर दुसऱ्याने व्हीडिओ पाहून अंगावर काटा आला असं म्हटलंय.
Disturbing Visuals
Claimed to be from Palani to Kodaikanal road. Probable reason might be RTA. pic.twitter.com/z79BNm4lsZ
— WildLense® Eco Foundation ?? (@WildLense_India) May 5, 2022
याच ट्विटर अकाऊंटवरून बिबट्याचा आणखी एक व्हीडिओ शेअर करण्यात आला आहे. यात बिबट्या आक्रमक दिसतोय.याला किती “सुंदर कॅटवॉक….. खडकावर चालणारा बिबट्या”, असं कॅप्शन देण्यात आलं आहे. हा व्हीडिओही बऱ्याचदा पाहिला गेला आहे.
What a graceful catwalk….. Leopard on the rocks #Reels #leopard @ParveenKaswan @Sony @Sony4KChannel pic.twitter.com/arATBmiHGp
— WildLense® Eco Foundation ?? (@WildLense_India) May 4, 2022