Ice Cream: हे आईस्क्रीम बघा! बास्स!! हाच दिवस यायचा राहिला होता, क्रिएटिव्हिटीचा कहर, लोकांच्या संमिश्र प्रतिक्रिया!

| Updated on: Sep 30, 2022 | 11:49 AM

क्रिएटिव्हिटी कधी कुठे आणि कशा स्वरूपात बाहेर पडेल काहीच सांगता येत नाही. आता तुम्हीच सांगा आईस्क्रीम बनवणं काय क्रिएटिव्हिटीची गोष्ट आहे का?

Ice Cream: हे आईस्क्रीम बघा! बास्स!! हाच दिवस यायचा राहिला होता, क्रिएटिव्हिटीचा कहर, लोकांच्या संमिश्र प्रतिक्रिया!
Ice cream flavor
Image Credit source: Social Media
Follow us on

लोकांची क्रिएटिव्हिटी म्हणजे, जिचा काहीच नेम नसतो! ही क्रिएटिव्हिटी कधी कुठे आणि कशा स्वरूपात बाहेर पडेल काहीच सांगता येत नाही. आता तुम्हीच सांगा आईस्क्रीम बनवणं काय क्रिएटिव्हिटीची गोष्ट आहे का? लोक त्यात सुद्धा कमी पडत नाहीत. वेगवेगळ्या फ्लेवर्सचे आईस्क्रीम आधी सुद्धा होतेच ना, पण आता लोक फ्लेवर्स मध्ये सुद्धा क्रिएटिव्हिटी दाखवतात. गेल्या पाच सहा वर्षात आईस्क्रीमचे भन्नाट फ्लेवर्स आलेत बरं का. पेरूचं आईस्क्रीम हे त्यातले त्यात सगळ्यांनाच माहित असणारं हटके फ्लेवर! आता या व्हिडीओ मध्ये क्रिएटिव्हिटीचा कहर आहे. यात बटर चिकन आईस्क्रीम आहे. एक शेफ ते सर्व्ह करतोय आणि तेही ग्रीन चटणी सोबत. बापरे! हसावं की रडावं?

बघा व्हिडीओ…

या व्हिडीओ मध्ये या शेफची क्रिएटिव्हिटी दिसेल. केसरी रंगाचं आईस्क्रीम तो वाट्यांमध्ये सर्व्ह करतोय. फार मन लावून तो हे काम करताना दिसतोय.

या वाट्या बर्फात ठेवलेल्या आहेत. मंडळी तो फक्त केसरी रंगाचं आईस्क्रीम सर्व्ह करत नाही. तो त्यावर हिरवी चटणी आणि सोबत बटर सुद्धा सर्व्ह करतोय. बटर चिकन फ्लेवर आहे ना!

देव जाणे कुणी खाल्लं असेल हे आईस्क्रीम पण क्रिएटिव्हिटीला दाद नाही बरं का! व्हिडीओ शेअर करताना विचारलं गेलंय, “आम्ही बटर चिकन आईस्क्रीम बनवलंय! हे बटर चिकनच्या प्युरी पासून बनवलंय आणि आम्ही ते ग्रीन चटणी सोबत सर्व्ह करतोय. तुम्ही हिंमत करणार का बटर चिकन फ्लेवरचं आईस्क्रीम खायची?”

जर तुम्हाला वाटत असेल की गेल्या काही वर्षांत तुम्ही सर्व प्रकारच्या विचित्र अन्नाचे मिश्रण पाहिले असेल तर हा व्हिडीओ बघून तुमचे डोळे उघडतील.

फूडवूडइंडियाने हा व्हिडीओ शेअर केलाय. व्हिडिओला 1 लाखाहून अधिक व्ह्यूज आहेत. अनेक प्रतिक्रिया उमटल्या. काहींना हे कॉम्बिनेशन ट्राय करायची खूप इच्छा आहे. काहींना ही आयडियाच बोगस वाटते.