मुंबई : सोशल मीडियावर जगभरातील अनेक व्हिडीओ दररोज व्हायरल होत असतात. ज्यावर जगातील प्रत्येक कोपऱ्यातून अनेकजण लाईक आणि कमेंट करत असतात. जगभरातून या व्हिडीओजना प्रेम मिळतं. असाच एक व्हिडीओ सध्या सर्वांची मनं जिंकत आहे. हा व्हिडीओ एका आयएफएस अधिकाऱ्याने शेअर केला असून यामध्ये एक लहानगा चमच्याच्या मदतीने तहानलेल्या कबूतराला पाणी पाजत आहे. सध्या या व्हिडीओची सोशल मीडियावर बरीच चर्चा होत असून नेटकरीही हा व्हिडीओ शेअर करत आहेत.
या व्हिडीओमध्ये एक मुलगा त्याच्या घराच्या ग्रीलमधून बाहेर बसलेल्या कबुतराला चमच्याने पाणी पाजत आहे. तो खिडकीतून बाहेर हात काढून हळूहळू चमच्याने तहाणलेल्या कबुतराला पाणी पाजून त्याची तहाण भागवत आहे. या व्हिडीओत मुलाला कबुतराला पाणी पाजण्यासाठी बरचं मेहनत घ्यावी लागत आहे. पण अखेर मुलगा त्याच्या कामात आणि कबुतराची तहाण भागवण्यात यशस्वी होतो. मुलाचं हे दयावान वागणं पाहून नेटकरी खुश झाले आहेत.
Be kind even & especially when people aren’t watching you ? pic.twitter.com/QbTEAYcCQa
— Praveen Angusamy, IFS ? (@PraveenIFShere) September 12, 2021
हा व्हिडीओ 12 सप्टेंबर रोजी भारतीय वन सेवा (IFS) अधिकारी प्रवीण अनग्युसॅमी यांनी पोस्ट त्याच्या ट्विटर अकाउंटवर पोस्च केला आहे. त्यांनी व्हिडीओला ‘दयाळू व्हा, तेव्हाही जेव्हा कोणीही पाहत नसेल तेव्हाही’ असं कॅप्शन दिलं आहे. या व्हिडीओला 45 हजाराहूंन अधिक जणांनी पाहिलं असून आणखी नेटकरीही हा व्हिडीओ पाहत आहेत. अनेकजणांनी लाईक आणि कमेंट करत व्हिडीओवरील प्रेम दर्शवलं आहे.
हे ही वाचा-
VIDEO: कुत्रा आणि कबुतराची जोडी जमली, दोघांची मैत्री पाहून सर्वच चकीत
VIDEO | गजबजलेल्या चौकात मॉडेलचा डान्स, नेटिझन्सनी फटकारलं, गुन्हा दाखल
कुत्रे किती हुशार असतात, व्हिडीओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘काय भन्नाट व्हिडीओ आहे!’
(Child gave water to thirsty pigeon hearwarming video goes viral)