मुंबई : सोशल मीडियावर कधी काय चर्चेत येईल याचा नेम नसतो. या मंचावर कधी एखादा प्रँक व्हिडीओ धम्माल उडवून देतो. तर कधी एखादा विनोदी व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांचे हसून हसून पोट दुखायला लागते. या मंचावर लहान मुलांचे व्हिडीओदेखील मोठ्या आवडीने पाहिले जातात. त्यांच्या करामती पाहून नेटकरी चांगलेच आनंदी होतात. सध्या तर एक अजब गजब व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका मुलाने म्हाताऱ्या आजोबांची हुबेहूब नक्कल केली आहे.
व्हायरल होत असलेला व्हिडीओ नेमका कुठला आहे, याची माहिती मिळू शकलेली नाही. मात्र फक्त सात सेकंदांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच भाव खाऊन जातोय. कारण या व्हिडीओमध्ये छोट्या मुलाने म्हाताऱ्या आजोंबाची केलेली नक्कल खळखळून हसायला लावणारी आहे. आजोबा जसेजसे पुढे चालतील अगदी तशाच पद्धीतीने व्हिडीओतील छोटा मुलगा चालत आहे.
व्हायरल होत असलेला व्हिडीओ खूप मजेदार आहे. या व्हिडीओमध्ये एक म्हातारे आजोबा रस्त्याने चालताना दिसत आहेत. हात मागे नेत ते आरामात चालत आहेत. त्यांच्या मागे एक छोटासा मुलगा चालत आहे. आपल्या समोरच्या आजोबांना पाहून तो हुबेहूब त्यांच्यासारखे चालण्याचा प्रयत्न करतोय. तोसुद्धा आपले हात मागे बांधून हळूहळू पाऊल टाकत चालत आहेत. छोट्या मुलाची नक्कल पाहून म्हातारे आजोबा भारावून गेले आहेत. ते या छोट्या मुलाकडे पाहत असल्याचं व्हिडीओमध्ये दिसतंय.
पाहा व्हिडीओ :
आज-कल के बच्चे ?? pic.twitter.com/lEG7E5djAg
— Dipanshu Kabra (@ipskabra) November 30, 2021
हा व्हिडीओ नेटकऱ्यांना खूप आवडला आहे. नेटकरी या व्हिडीओला पाहून भन्नाट कमेंट्स करत असून त्याल शेअर आणि लाईक करत आहेत. काही नेटकऱ्यांनी हा छोटा मुलगा अगदीच क्यूट असल्याचं म्हटलंय. तर कही नेटकऱ्यांनी मुलाच्या निरागसतेचे कौतूक केले आहे. मुले जन्माला येताच स्मार्ट दिसायला लगतात. हा मुलगा खरंच नॉटी आहे, असे एका नेटकऱ्याने म्हटलेय. हा व्हिडीओ नेटकरी सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या माध्यमावर शेअर करत आहेत.
इतर बातम्या :