19 डिसेंबरला चिली(Chile)ला नवा अध्यक्ष मिळाला. त्यांचं सत्तेवर येणं हा साऱ्या जगासाठी चर्चेचा विषय होता. कारण वयाच्या 35व्या वर्षी गॅब्रिएल बोरिक (Gabriel Boric) हे चिलीचे सर्वात तरुण राष्ट्रपती बनले आहेत. त्यांनी आपल्या देशात डाव्यांची सत्ता आणली आहे. उजव्या विचारसरणीचे नेते 55 वर्षीय जोस अँटोनियो (Jose Antonio) यांचा त्यांनी पराभव केला. गॅब्रिएल यांना 56 टक्के मतं मिळाली. गॅब्रिएल आता आपल्या देशात डाव्यांचा नवा चेहरा बनलेत.
Es deber de todos unirnos para garantizar que la Convención Constitucional llegue a buen puerto. Desde La Moneda estaremos al servicio de este proceso diverso y democrático, respetando su autonomía. pic.twitter.com/RMynlp8VT1
— Gabriel Boric Font (@gabrielboric) December 21, 2021
गॅब्रिएल बोरिक यांच्याशी संबंधित काही खास गोष्टी आहेत, पण त्यातली एक उत्सुकतेची बाब आहे, ज्यामुळे ते चर्चेत आलेत. एका वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, गॅब्रिएल यांनी त्यांचा कुत्रा ब्राउनीचं इन्स्टाग्राम अकाउंट (ब्राउनी इन्स्टाग्राम) तयार केलंय.
अवघ्या काही दिवसांत त्यांचा कुत्रा ब्राउनी आता सोशल मीडियावर स्टार झालाय. चिलीच्या राष्ट्राध्यक्षांच्या कुत्र्यानंही अर्जेंटिनाच्या राष्ट्राध्यक्षांच्या कुत्र्याशी गप्पा मारल्या. ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होतेय. फेसटाइमवर अर्जेंटिनाच्या राष्ट्राध्यक्षांचा कुत्रा डिलन(Dylan)शी बोलला. यानंतर डिलननं आपल्या पोस्टमध्ये लिहिलं, की आम्ही आपापसांत बोलून हे जग चांगलं बनवू.
डायलननंही ब्राउनीचं अभिनंदन केलं. गॅब्रिएल यांनी निवडणूक जिंकल्याच्या दिवशी आपल्या कुत्र्याचं अकाउंट काढलं. हे अकाउंट तयार केल्यानंतर काही दिवसांतच ब्राउनीला 3 लाखांहून अधिक फॉलोअर्स मिळाले आहेत. अर्जेंटिनाच्या राष्ट्राध्यक्षांच्या कुत्र्याच्या फॉलोअर्सपेक्षा त्यांच्या कुत्र्याचे फॉलोअर्स जास्त आहेत. त्याचवेळी एका फोटोमध्ये तो चिलीच्या मॉर्निंग शोमध्ये मुलाखत देतानाही दिसतोय.
चिलीचे अध्यक्ष बोरिक 2014मध्ये पहिल्यांदा काँग्रेसमध्ये गेले होते. त्यानंतर उच्च शिक्षणासंदर्भात त्यांनी निदर्शनं केली. त्यांच्या विजयानं देशातल्या डाव्यांना पुन्हा एकदा नवा आयाम मिळालाय.