मुंबई: उद्योगपती आनंद महिंद्रा असो किंवा हर्ष गोएंका यांचे ट्विट नेहमीच इंटरनेटवर लोकांची मने जिंकतात! हर्ष गोएंका यांचे एक ट्विट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हर्ष गोएंका यांनी 15 एप्रिल रोजी एक क्लिप पोस्ट केली होती, ज्याच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले होते, ” “इथे राहण्याची कल्पना करा”. खरं तर गोएंका यांनी एक व्हिडिओ शेअर केला होता जो पाहून लोक आश्चर्यचकित झाले होते. प्रथमदर्शनी तुम्हाला ही घरं बनावट वाटतील. पुलावर बांधलेली ही रंगीबेरंगी घरं ‘ड्रीम वर्ल्ड’ची वाटतात. पण ही घरे खरोखरच या पृथ्वीवर अस्तित्वात आहे. रिपोर्टनुसार, चीनमध्ये अशी एक जागा आहे जिथे आउट ऑफ ट्रेंड पुलांवर घरे बांधली गेली आहेत आणि ते पाहण्यासाठी दूरवरून पर्यटक येतात.
रिपोर्टनुसार, चीनमधील चोंगकिंग मध्ये ही आश्चर्यकारक वसाहत आहे, जी अशा प्रकारची पहिली वसाहत आहे. पुलावर ही वसाहत बांधण्यात आली आहे. होय, संपूर्ण पुलावर एका रेषेत तुम्हाला ही रंगीबेरंगी घरं दिसतील, ज्याखाली नदी वाहत आहे. 400 मीटर लांबीच्या पुलावरील ही वस्ती पर्यटकांसाठी खास आकर्षण आहे. चोंगकिंग या डोंगराळ शहरात 13,000 हून अधिक पूल आहेत. पूर्वी निरुपयोगी ठरलेल्या अनेक पुलांचे रूपांतर आता पॉकेट पार्क, खेळाची मैदाने, करमणुकीची मैदाने, वॉकवे आणि वाहनतळांमध्ये करण्यात आले आहे. पूल आणि रेल्वे वाहतूक ही या शहराची खास ओळख आहे.
Imagine living here….. pic.twitter.com/foa7F4jTdC
— Harsh Goenka (@hvgoenka) April 15, 2023
ही अनोखी आणि सुंदर वस्ती पाहून काही युजर्स म्हणाले की, “हे भन्नाट आहे, फक्त खांब मजबूत असावेत जेणेकरून ही घरे पडणार नाहीत”, “इथे राहणे एखाद्या साहसापेक्षा कमी नाही आणि या घरांच्या खिडकीतून दिसणारे दृश्य जबरदस्त असेल” अशी टिप्पणी आणखी एकाने केली. ही घरं पाहून एक माणूस इतका मंत्रमुग्ध झाला की त्याने लिहिलं की, अशा ठिकाणी छोटंसं घर असेल तर राजवाड्याची काय गरज. हर्ष गोएंका यांच्या या ट्विटला शेकडो कमेंट्स तसेच हजाराहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तसेच हा व्हिडिओ 1 लाख 48 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे.