मुंबई : चीनच्या सोशल मीडियावर प्रभाव पाडणारा लुओ शाओ माओ माओ झीचा (Luo Xiao Mao Mao Zi) कीटकनाशक सेवन केल्यानंतर मृत्यू झाला आहे. लाईव्ह स्ट्रीमिंग (Live Streaming) दरम्यान माओ झीने कीटकनाशक प्यायले. तिच्या फॉलोअर्सने तिला कीटकनाशक पिण्यास प्रवृत्त केले असल्याची माहिती आहे.
कीटकनाशकाचं सेवन केल्यानंतर 25 वर्षीय माओची प्रकृती खालावली, तेव्हा तिने स्वत: साठी रुग्णवाहिकाही बोलावली, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. चीनच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Douyin वर शेवटच्या व्हिडीओमध्ये माओ स्वतः म्हणाली होती – “हा कदाचित माझा शेवटचा व्हिडीओ आहे कारण मी बऱ्याच काळापासून नैराश्याने (Depression) ग्रस्त आहे.”
Douyin वर माओचे 670,000 पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. लुओ तिच्या शेवटच्या व्हिडीओमध्ये कीटकनाशक घेऊन दिसत आहे. ती सांगते की ती कोणत्याही उत्पादनाची विक्री करण्यासाठी हा व्हिडीओ बनवत नाहीये. यानंतर, ती लाईव्ह स्ट्रीमिंगदरम्यान कीटकनाशक पिते.
‘डेली स्टार’नुसार, ही घटना 14 ऑक्टोबर रोजी माओ झीसोबत घडली. दुसऱ्या दिवशी तिचा मृत्यू झाला. माओच्या एका मित्राने सांगितले की ती तिच्या प्रियकरामुळे काही काळापासून अस्वस्थ होती. कीटकनाशक पिऊन स्वतःचा जीव घेण्याचा तिचा हेतू नव्हता. तिला फक्त तिच्या प्रियकराचे लक्ष वेधायचे होते.
माओने कीटकनाशक प्यायले तेव्हा हजारो लोक तिला थेट पाहत होते. चिनी माध्यमांच्या मते, माओला लाईव्ह दरम्यान अनेक फॉलाअर्सने तिला कीटकनाशक “लवकर पिण्यास” प्रवृत्त केले होते.
विना ड्रायव्हर रस्त्यावर धावणारी बाईक पाहिलीये का, व्हायरल व्हिडीओने आनंद महिंद्राही आवाकhttps://t.co/wgTr0wo11j#TrendingNews #ViralNews #ViralNewsInMarathi
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 21, 2021
संबंधित बातम्या :
Kapil Dev | कपिल देव यांचा रणवीर सिंग लूक व्हायरल, चाहत्यांकडून मजेशीर कमेंट्स