आता हा काय ट्रेंड? फक्त फोटोशूटसाठी ‘प्रेग्नेंट’ होतायत या अविवाहित मुली; धक्कादायक प्रकार

| Updated on: Dec 24, 2024 | 8:53 PM

एका विचत्र ट्रेंडमुळे सर्वांचेच डोके चक्रावलं आहे. चक्क सुंदर फोटोशूटसाठी अविवाहित मुली प्रेग्नेंट होत आहेत. ना लग्न, ना रिलेशनशिप फक्त फोटोशूटसाठी या मुलींना 'प्रेग्नेंट' व्हायचं आहे. काय आहे धक्कादायक ट्रेंड आणि कुठे सुरु आहे हा प्रकार?

आता हा काय ट्रेंड? फक्त फोटोशूटसाठी प्रेग्नेंट होतायत या अविवाहित मुली; धक्कादायक प्रकार
Follow us on

या जगात कधी काय ट्रेंड निघेल काही सांगता येत नाही. आजकाल इतक्या गोष्टी आपल्या आजुबाजूला घडत असतात. ते पचवनही कठीण जातं. असाच एक ट्र्रेंड सध्या सुरु आहे ज्याच्याबद्दल वाचून नक्कीच धक्का बसेल.

असा ट्रेंड पहिल्यांदाच पाहायला मिळाला असेल. फक्त फोटोशूटसाठी अविवाहित मुली प्रेग्नेंट होऊ लागल्या आहेत. होय, कोणत्याही रिलेशनशिप अन् लग्नाशिवायच या मुली प्रेग्नेंट होऊन फोटोशूट करत आहे. हा विचित्र ट्रेंड सुरु आहे चीनमध्ये.

शेजारी असणाऱ्या चीन देशातील हा विचार करायला लावणारा ट्रेंड सुरु झाला आहे, जो पचनी पडणे खरच कठीण आहे. चीनमधील काही मुली अविवाहित असताना देखील प्रेग्नेंट राहून फोटोशूट करताना दिसत आहेत.

सोशल मीडियावर त्यांच्या या फोटोशूटची जोरदार चर्चा सुरु आहे. पण याचा त्या मुलींवर काहीही परिणाम होताना दिसत नाहीये. पण या मुली असं का करत असतील . जाणून घेऊयात

फोटोशूटसाठी मुली का होतायत ‘प्रेग्नेंट’?

एका रिपोर्टनुसार, सोशल मीडियावर काही तरुणी आणि अविवाहित मुली प्रेग्नेंट होऊन फोटोशूट करताना दिसत आहेत. या मॅटर्निटी फोटोशूटमध्ये या मुली ‘प्रेग्नेंट’ होत नसून बनावट बेबी बंप लावून फोटोशूट करत आहेत. जेन -जींचा हा नवा ट्रेंड पाहून चीनमधील पालकांना देखील मोठा धक्का बसला आहे.

चीनमधील मुली फक्त फोटोशूटसाठी असं का करतायत?

चीनमधील मुलींच्या या फोटोशूटच्या मागे मुलींचा असा तर्क आहे की, त्या अजून काही दिवस लग्न करणार नाहीत. पण त्यांना त्यांच्या प्रेग्नेंसी फोटोशूटमध्ये स्लिम आणि सुंदर दिसायचे आहे. जर या मुली 30 व्या वर्षी प्रेग्नेंट राहिल्या तर त्यांच्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडतील. पण त्या 26 व्या वर्षी जर त्यांनी हे फोटोशूट केलं तर त्या आहे तशा तरूण दिसतील.

नेटकऱ्यांकडून ट्रोल 

याच विचाराने चीनमधील मुली आधीच त्यांचे फोटोशूट करून घेत आहेत. त्यानंतर जेव्हा त्या प्रेग्नेंट होतील तेव्हा हेच फोटो त्या शेअर करतील. त्यावर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी या गोष्टीला किंवा या ट्रेंडला प्रचंड ट्रोल केलं आहे.