बीजिंग : तुम्ही सिनेमे पाहिले असतील तर त्यातील काही गोष्टी तुमच्या अजूनही लक्षात असतील. अभिनेत्याचा अपघात होतो. त्यानंतर त्याला स्मृतीभ्रंश होतो. त्याला काहीच आठवत नाही. बायको आणि मुलं सुद्धा. नंतर कधी तरी त्याला अचानक सर्व काही आठवतं. हिरो पत्नी आणि मुलांच्या जवळ जातो आणि सिनेमाचा शेवट गोड होतो. सिनेमाचं हे कथानक एव्हाना तुमच्या तोंडपाठ झालं असेल. चीनमध्येही अशीच घटना घडली. पण थोडी वेगळी आणि धक्कादायक आहे. चीनमध्ये एका व्यक्तीला स्मृतीभ्रंश झाला. त्याला काहीच आठवत नव्हतं. फक्त त्याला त्याची बायको आठवत होती. त्यामुळे तो डोक्याला ताण देत देत पत्नीचा शोध घेत होता. वेदनादायी बाब म्हणजे त्याच्या पत्नीचा आधीच मृत्यू झाला होता. अन् हे त्याला आठवत नव्हतं. ही लव्ह स्टोरी सध्या चीनमधील प्रत्येकाला हेलावून सोडत आहे. ही लव्ह स्टोरी वाचल्यावर अनेक काळीज धडधडत आहेत. या लव्ह स्टोरीची अख्ख्या चीनमध्ये चर्चा रंगली आहे.
चीनी सोशल मीडियावर या व्यक्तीची ही हृदयस्पर्शी लव्ह स्टोरी व्हायरल होत आहे. ही लव्ह स्टोरी ऐकून अनेकांचे डोळे पाणावत आहेत. ही स्टोरी वाचल्यानंतर तुमच्याही डोळ्यातून अश्रू तरळल्याशिवाय राहणार नाही. साऊथ चायना मॉर्निंग पोस्टने याबाबतचं वृत्त दिलं आहे. शांघाय य़ेथे राहणारा एक तरुण झांग याचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत हा तरुण इकडे तिकडे सैरावैरा फिरताना दिसत आहे. तर कधी पोलीस त्याच्याशी चर्चा करताना दिसत आहेत. कधी तो पायी चालताना दिसतोय तर कधी सायकलवरून जाताना दिसतोय…
बायकोच्या शोधात झांग इकडे तिकडे भटकताना दिसत आहे. त्याच्या सांगण्यावरून पोलिसांनी त्याच्या पत्नीचा शोध घेतला. त्यावेळी त्याच्या पत्नीचा दोन वर्षापूर्वीच मृत्यू झाल्याचं आढळून आलं. पण त्याची माहिती त्याला नव्हती. कारण त्याला त्यावेळी स्ट्रोक आला होता. त्यामुळे त्याला विस्मरण झालं होतं. स्मृतीभ्रंश झाला होता. एवढेच नव्हे तर तो त्याच्या पत्नीला रस्त्यातच विसरून गेला होता. नंतर त्याला पत्नीचं स्मरण होऊ लागलं. त्यामुळे पोलिसांनी त्याच्या सांगण्यावरून शोध घेतला. तेव्हा त्याची पत्नी मृत झालेली होती. तर त्याला मुलंही नसल्याचं आढळून आलं आहे.
झांग याची ही लव्ह स्टोरी सोशल मीडियावर व्हायरल झाली. त्यामुळे प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू तरळले. पत्नीशिवाय हा तरुण सर्व काही विसरला. ही अनोखी घटना आहे. अनोखी प्रेम कहानी आहे, असं काही जण म्हणत आहेत. तर काही लोक ही हृदयद्रावक कहानी असल्याचं म्हणत आहेत.