पती-पत्नीचं नातं विश्वासाचं नातं असतं. त्यात प्रामाणिकपणा असावा लागतो. विश्वास आणि प्रामाणिकपणाचा अभाव असेल तर हे नातं तुटू शकतं. पण जगात अशीही काही जोडपी असतात की, त्यांना नातं तुटलं तरी त्याचा काही फरक पडत नाही. हे लोक नात्यापेक्षा इतर गोष्टींना अधिक महत्त्व देत असतात. तर काही लोक लपून छपून त्यांची प्रकरणं सुरू ठेवतात. त्याची पुसटशी खबर सुद्धा जोडीदाराला लागू देत नाहीत. चीनमध्ये असंच एक लफडं समोर आलं. त्यामुळे सर्वांनाच धक्का बसला.
चीनच्या वृत्तपत्रांनी या बातमीला अधिक महत्त्व दिलं आहे. कारणच तसं आहे. चीनच्या एका व्यक्तीचे एक दोन नव्हे पाच लफडे समोर आले आहेत. एकाचवेळी पाचजणींना तो धोका देत होता. विशेष म्हणजे या पाचही जणी एकाच इमारतीत राहायच्या. त्यापैकी एकीलाही माहीत नव्हतं की आपला पार्टनर एकच आहे. एक दोन नव्हे चांगली चार वर्ष त्याचा हा खेळ सुरू होता. त्याच्या बायकोलाही नवऱ्याची ही करामत कधीच कळली नाही.
चीनच्या जिलिन प्रांतात तो राहतो. त्याचे वडील कन्स्ट्रक्शन सेक्टरमध्ये काम करतात. आई बाथहाऊसमध्ये अटेंडंट म्हणून काम करते. गरिबीमुळे त्याला शिक्षण सोडावं लागलं होतं. पण तो स्वत:ला श्रीमंत असल्याचा भासवायचा. त्याने एका मुलीशी अफेयर सुरू केलं. तिला महागडे गिफ्ट देऊन फसवलं. प्रेग्नेन्सीनंतर त्यांनी लग्नही केलं. या महिलेला जेव्हा या व्यक्तीची असलियत माहीत पडली. तेव्हा तिने त्याला सोडून दिलं. या घटनेनंतर त्याने दुसऱ्या मुलीला फसवलं. पुन्हा तीच कहाणी रिपीट केली. यावेळी घराची डागडुजी करायची म्हणून तिच्याकडून 16.5 लाख रुपयेही उधार घेतले. एवढेच नव्हे तर याच इमारतीतील भाड्याने घेतलेल्या रुममध्ये प्रेग्नेंट गर्लफ्रेंडला ठेवलं. त्याच इमारतीत त्याची पहिली बायकोही राहत होती.
त्याने हे पैसे दुसऱ्या मुलींना जाळ्यात ओढण्यासाठी खर्च केले. त्याने त्याच इमारतीत विद्यापीठातील दोन विद्यार्थीनी आणि एका नर्सलाही आपल्या जाळ्यात ओढले. त्यांच्याकडून त्याने 1.7 लाख, 1.18 लाख आमि 94 हजार रुपये उकळले. यातील एका मुलीने जेव्हा त्याला तिचे पैसे मागितले तर त्याने एक बॅग भरून तिला नकली नोटा दिल्या. जेव्हा या मुलीने संतप्त होऊन पोलिसात तक्रार दाखल केली तेव्हा त्याची ही सर्व लफडी बाहेर आली. मुलाला फिरवत असताना त्याची पत्नी आणि दुसऱ्या गर्लफ्रेंडशी ओळख झाली होती. दोघींचा नवरा एकच आहे, हे त्यांना माहीतही नव्हतं. हे प्रकरण कोर्टात गेल्यानंतर कोर्टाने या मुलींचे पैसे त्यांना मिळवून दिले. तसेच या व्यक्तीला 14 लाखाचा दंड ठोठावला. तसेच त्याला साडे नऊ वर्षाची शिक्षाही ठोठावली.