गाजलेला Condom Cafe! इथे कॅफेमधली प्रत्येक गोष्ट बनलीये कंडोम पासून

| Updated on: Dec 24, 2022 | 2:49 PM

हे कॅफे बघा हे कॅफे काच किंवा लाकड नाही तर कंडोमपासून!

गाजलेला Condom Cafe! इथे कॅफेमधली प्रत्येक गोष्ट बनलीये कंडोम पासून
Condom cafe in thailand
Image Credit source: Social Media
Follow us on

आजकाल सर्व वयोगटातील लोकांना खाण्या-पिण्यासाठी नवनवीन ठिकाणं शोधायला आवडतात. लोक केवळ रेस्टॉरंटच्या आतच जेवतात असे नाही तर रेस्टॉरंट किंवा हॉटेलचे वातावरण, ते कुठे बांधले गेले आहे आणि त्याची थीम काय आहे हे देखील पाहतात. हे कॅफे बघा हे कॅफे काच किंवा लाकड नाही तर कंडोमपासून! ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

होय, आम्ही थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये असलेल्या कॅबेज आणि कंडोमबद्दल (Cabbages and Condoms) बोलत आहोत, इथे सजवलेली प्रत्येक गोष्ट कंडोमपासून बनलेली आहे.

टेबलावर ठेवलेली मूर्ती असो किंवा नकली फुलांची पानं असोत, सगळं काही कंडोमपासून बनलेलं आहे. अलीकडेच सोहम सिन्हा नावाच्या एका व्लॉगरने थायलंडमधील लोकप्रिय कंडोम कॅफेला भेट दिली आणि रंगीबेरंगी कंडोमच्या माध्यमातून अनेक गोष्टी तयार केल्याचं दाखवून दिलं.

इथे उपस्थित असलेल्या प्रत्येक गोष्टीच्या डिझायनिंगमध्ये कंडोमचा वापर केला गेला आहे. तिथे उभ्या असलेल्या पुतळ्याचे कपडे असोत किंवा सांताची दाढी असो, प्रत्येक गोष्टीची रचना अतिशय हुशारीने आणि विचारपूर्वक करण्यात आली आहे.

व्हिडीओमध्ये सांताक्लॉजची दाढी, ख्रिसमस ट्री, हँगिंग लॅम्प हे सर्व कंडोमचे बनलेले असल्याचं दिसत आहे. कॅबेज आणि कंडोम रेस्टॉरंट्स कुटुंब नियोजनाची अधिक चांगली समज आणि स्वीकृती वाढविण्याच्या आशेने तयार केली गेली आहेत.

हा व्हिडिओ शेअर करताना युझरने लिहिले की, जगातील सर्वात विचित्र कॅफे! बातमी लिहिताना पाच लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ लाइक केला असून त्यावर कमेंट्स दिल्या जात आहेत.