बॉसने सुट्टीच्या दिवशी सांगितले काम, कर्मचाऱ्याने दाखवला इंगा! स्क्रीनशॉट व्हायरल

| Updated on: Mar 23, 2023 | 11:33 AM

एका ट्विटर युजरने असे करून सर्वांसमोर एक सकारात्मक उदाहरण उभे केले आहे. रघू नावाने ओळखल्या जाणाऱ्या या युजरने त्याच्या व्हॉट्सॲपचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे, ज्यात त्याने सुट्टीच्या दिवशी काम कसे नाकारले हे दाखवण्यात आले आहे.

बॉसने सुट्टीच्या दिवशी सांगितले काम, कर्मचाऱ्याने दाखवला इंगा! स्क्रीनशॉट व्हायरल
how to say no to boss
Image Credit source: Social Media
Follow us on

कॉर्पोरेट कल्चरमध्ये काम करणारे सर्व लोक आपल्या कंपनीसाठी आणि आपल्या बॉससाठी नेहमीच काम करण्यास तयार असतात. कोणत्या दिवशी सुट्टी आहे हे ते पाहत नाहीत किंवा ऑफिसची वेळ संपल्यानंतरही ऑफिसमध्ये अतिरिक्त वेळ देतात. मात्र, काही कर्मचाऱ्यांना सुट्टीच्या दिवशी घरीच वेळ घालवायचा असतो, तर बॉसच्या नजरेत चांगलं होण्यासाठी सुट्टीच्या दिवशीही काम करायला तयार असणारे अनेक जण असतात. सोशल मीडियावर एक व्हॉट्सॲप चॅट व्हायरल होत आहे, ज्यात एका व्यक्तीच्या बॉसने सुट्टीच्या दिवशी एक तास काम करण्यास सांगितले, परंतु त्याने स्पष्ट नकार दिला.

व्हॉट्सॲपवर बॉसच्या मेसेजला कर्मचाऱ्याने दिले असे रिप्लाय

अनेक कर्मचाऱ्यांना काम करण्यास नकार देणे अवघड जाते. एका ट्विटर युजरने असे करून सर्वांसमोर एक सकारात्मक उदाहरण उभे केले आहे. रघू नावाने ओळखल्या जाणाऱ्या या युजरने त्याच्या व्हॉट्सॲपचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे, ज्यात त्याने सुट्टीच्या दिवशी काम कसे नाकारले हे दाखवण्यात आले आहे. व्हॉट्सॲप चॅटमध्ये रघूला सुट्टीच्या दिवशी काम करण्यास सांगण्यात आले कारण क्लायंटला त्या दिवशी काही काम द्यायचे होते. बॉसने 2-4 मेसेज केले ज्यात त्याने मदत करण्यासाठी एक तास काम करण्याची विनंती केली, त्यावर तो म्हणाला, “मी या समस्येवर उद्या काम करीन,पण आज नाही.”

Whatsapp chat viral

ती व्यक्ती म्हणते की अतिरिक्त कामासाठी हो म्हणणे धोकादायक असते. असं करून तुम्ही तुमचं जीवन आणखी अडचणीत टाकत आहात. कामाच्या बहाण्याने लोक आपल्याला त्रास देत आहेत, हे स्वत: कर्मचाऱ्याला माहित आहे, परंतु तरीही तो ते करण्यास तयार आहे. रघूने स्क्रीनशॉटसह केलेल्या ट्विटमध्ये लिहिले की, “सुट्टीच्या दिवशी काम करू नये हे समजायला मला 5 वर्षे लागली. माझ्यासारखं होऊ नका. यावर लवकरच कठोर निर्णय घ्या. मेसेज वाचल्यानंतर त्याकडे दुर्लक्ष का केलं नाही, असं त्याला कुणीतरी विचारलं आणि नंतर त्याबद्दल बहाणा केला, तेव्हा रघू म्हणाला, “मला हे कसं करायचं हे माहित आहे, मला ते टाळण्याऐवजी त्याला सामोरं जायचं होतं आणि सांगायचं होतं.”