भारतीय लोक लग्नसमारंभात पाण्यासारखा पैसा खर्च नाही का? तुमचा जर माझ्यावर विश्वास नसेल तर…हा पाहा सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ, जो पाहिल्यानंतर अनेकांना आपण खूपच गरीब आहोत असं वाटू लागेल. खरं तर इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या क्लिपनुसार, नातेवाईक आणि मित्रांना त्यांच्या लग्नाच्या ठिकाणी घेऊन जाण्यासाठी एका जोडप्याने संपूर्ण विमानाचे बुकिंग केले. मंडळी कार, बस किंवा ट्रेन नाही, एक अख्ख विमान!
होय, व्हायरल व्हिडीओमध्ये विमानाची प्रत्येक सीट फुल्ल असून लोक कॅमेऱ्यात बघताना आपला आनंद व्यक्त करत असल्याचं पाहायला मिळतंय.
शेवटी कॅमेरा कपलकडे गेला की कॅमेऱ्याकडे पाहून तेही हसतात. हे विमान पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. इथून तिथून सगळ्या सीट्सवर नातेवाईक बसलेले आहेत. संपूर्ण विमानात लग्नाचा माहोल आहे.
हा व्हायरल व्हिडिओ इंस्टाग्राम हँडलवर शेअर shreyaa_shaah आहे. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले- तुम्हाला काय वाटते की आम्ही लग्नासाठी कुठे जात आहोत? या व्हायरल क्लिपला 11.7 मिलियन व्ह्यूज आणि 8.74 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.
तसेच, शेकडो युझर्सनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने कॅप्शनमध्ये लिहिले – हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मला गरीब असल्यासारखं वाटते.