मुंबई : कधीतरी अनावधाने टीशर्ट उलटं घातलं आणि घराबाहेर पडल्यानंतर इतर लोकांनी हे निदर्शनास आणून दिलं त्यानंतर आपली किती पंचायत होते? असे पंचायतीचे अनेक किस्से आहेत. कुणी चप्पल उलटं घालतं, तर कुणाचा पाय रस्त्यावर घरसल्याने जमिनीवर पडतं. या अशा पंचायतीचे अनेक व्हिडीओ आपण बघितले आहेत. सोशल मीडियावर असे व्हिडीओ हमखास व्हायरल होत असतात.
आतादेखील असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत एक आजोबा आपल्या पत्नीसोबत नृत्य करताना दिसत आहेत. पण अचानक त्यांच्यासोबत जे घडतं त्यामुळे ते चर्चेला कारण ठरतं. संबंधित प्रकाराचा व्हिडीओ देखील कॅमेऱ्यात अचूकपणे कैद झाला आहे.
संबंधित घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावरही प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओत एक वृद्ध दाम्पत्य एका पार्टीत हळूवारपणे नृत्य करताना दिसत आहे. यावेळी वृद्ध आजोबा त्यांच्या पत्नीच्या गालावर किस करतात. त्यानंतर ते हळूवारपणे कंबर वाकवत नृत्य करायला लागतात. पण तेवढ्यात अजबच घडतं.
आजोबांच्या कंबरेवरेला घट्ट असलेली पँट सूटते आणि खाली येते. पण आजोबा न घाबरता अतिशय संयमाने परिस्थितीत हाताळतात. ते तातडीने पँट वरती घेतात. हा सर्व प्रसंग कॅमेऱ्यात कुणीतरी अगोदरपासूनच कैद करत असतं. त्यामुळे संपूर्ण घटना कॅमेऱ्यात अचूकपणे कैद झाली आहे. त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला.
संबंधित व्हिडीओवर युजर्स वेगवेगळ्या प्रतिक्रिया घेत आहेत. आजोबांसोबत हा प्रसंग घडत असताना आजींची रिअॅक्शन बघण्यासारखी होती, असं एका युजरने म्हटलं आहे. तर दुसऱ्या एका युजरने हा व्हिडीओ या वर्षातला सर्वात भारी व्हिडीओ आहे, असं म्हटलं. याशिवाय अनेक युजर्सने भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. या व्हिडीओ इन्स्टाग्रामवर younglandlord01 या युजरआयडीवरुन शेअर करण्यात आला आहे. तसेच या व्हिडीओला जवळपास 2 लाखापेक्षाही जास्त लोकांनी बघितलं आहे.
हेही वाचा :
नवरी दिसताच नवरदेव खुलला, वाजवली लग्नमंडपातच शिट्टी, मजेदार व्हिडीओ व्हायरल
फाडफाड इंग्रजी, कचरा वेचणाऱ्या आजींचं इंग्रजी ऐकून चकीत व्हाल!