अनोळखी मुलगा-मुलगी 10 दिवस एका खोलीत बंद, बाहेर आल्यावर सर्वांना आश्चर्याचा धक्का

| Updated on: Jan 03, 2023 | 3:25 PM

दोघंही एकमेकांना भेटले तेव्हा एका कपलची स्टोरी व्हायरल झाली. त्याची कहाणी प्रचंड व्हायरल झाली.

अनोळखी मुलगा-मुलगी 10 दिवस एका खोलीत बंद, बाहेर आल्यावर सर्वांना आश्चर्याचा धक्का
couple
Image Credit source: Social Media
Follow us on

जगभरातून जोडपी आणि नात्यांची अनेक प्रकरणं येतात आणि व्हायरलही होतात. चीनच्या अनेक भागात कोरोनामुळे लॉकडाऊन लागू करण्यात आले तेव्हा असेच एक प्रकरण समोर आले. दरम्यान, लॉकडाऊनच्या काळात दोघंही एकमेकांना भेटले तेव्हा एका कपलची स्टोरी व्हायरल झाली. त्याची कहाणी प्रचंड व्हायरल झाली.

खरं तर ही घटना चीनच्या शेनझेन प्रांतातील आहे. साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या वृत्तानुसार, एक मुलगा आणि एक मुलगी ब्लाइंड डेटवर भेटायला गेले होते. स्थानिक प्रशासनाने नेमका तेव्हाच लॉकडाऊन जाहीर केला. ते दोघे एका खोलीत भेटले आणि तिथे लॉकडाऊन झाले. यानंतर दोघांनाही एकाच खोलीत दहा दिवस डांबून ठेवण्यात आले होते.

या काळात दोघांनी एकत्र स्वयंपाक केला, भरपूर गप्पा मारल्या, आपल्या आवडी-निवडीबद्दल, तसेच इतर अनेक गोष्टी एकत्र केल्या. या काळात बाहेर कोरोनामुळे खूप कडक नियम बनले होते आणि लोकांना नियम पाळावे लागले होते. या जोडप्याने त्यांच्या घरी असेही सांगितले की ते सुरक्षित आहेत आणि ते त्यांच्या मित्रांसह अडकले आहेत.

रिपोर्टनुसार, जेव्हा कोरोनाच्या काळात नियम थोडे शिथिल झाले तेव्हा दोघेही बाहेर आले. त्यांना एकाच खोलीत दहा दिवस कोंडून ठेवले होते आणि बाहेर आल्यावर त्यांनी लग्नाची घोषणा केली. लग्नाची घोषणा होताच दोघांच्याही नातेवाईकांना धक्काच बसला, पण जेव्हा त्यांनी आपली संपूर्ण कहाणी सांगितली तेव्हा सगळ्यांनीच या गोष्टीला होकार दिला.