VIRAL VIDEO: 102 वर्षांचा क्रिकेटर व्हिडिओ पाहून तुम्ही म्हणाल वाह.. मतदानाचा हक्क त्यांनी बजावला

| Updated on: May 20, 2024 | 9:39 AM

Viral Video Of 102 Year Old Cricketer: हाजी करम यांनी आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले आहे. लोकसभा निवडणुकीत त्यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. त्यांनी स्वत: मतदान करत इतरांनाही मतदानासाठी प्रवृत्त केले आहे. जम्मू-काश्मीरमध्येही लोकसभा निवडणुकीसाठी मतदान शांततेत पार पडले.

VIRAL VIDEO: 102 वर्षांचा क्रिकेटर व्हिडिओ पाहून तुम्ही म्हणाल वाह.. मतदानाचा हक्क त्यांनी बजावला
102-year-old Haji Karam Din
Follow us on

काही करण्यासाठी वयाचे बंधन नसते. अनेक जण कधीच निवृत्ती स्वीकारत नाही. जीवनाच्या शेवटपर्यंत सतत कार्यमग्न असतात. क्रीडा क्षेत्रात कार्यरत असणारे स्पर्धांमधून ठरविक वयानंतर माघार घेतात. परंतु क्रीडा क्षेत्राशी असलेला आपला संबंध जाऊ देत नाही. सोशल मीडियावर एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ 102 वर्षांच्या क्रिकेटरचा आहे. या वयात नेटमध्ये सराव करताना ते दिसत आहेत. जम्मू-कश्मीमधील हाजी करम दीन असे त्यांचे नाव आहे.

तरुण खेळाडूंसोबत क्रिकेटचा आनंद

हाजी करम दीन यांनी वयाची सेंचुरी केली आहे. परंतु त्यांचा व्हिडिओ पाहिल्यावर एखाद्या युवकासारखे त्यांचे
धैर्य दिसत आहे. हाजी करम दीन हे जम्मू-काश्मीरच्या रियासी येथील आहेत. ते त्यांच्या वयाला त्यांच्यावर वर्चस्व निर्माण करु देत नाही. ते तरुण खेळाडूंसोबत क्रिकेट खेळताना दिसतात. तसेच तरुणांना प्रेरणा देण्याचे काम करतात. आताही हाजी करम दीन आपला फिटनेस राखण्याचा आणि प्रत्येक कामात पूर्णपणे सक्रिय राहण्याचा प्रयत्न करतात. त्यांचा नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये हाजी करम दीन नेटवर फलंदाजी करताना दिसत आहेत. काही तरुण त्यांना गोलंदाजी करत आहेत आणि हाजी फटके मारण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.

हे सुद्धा वाचा

हजारो लोकांनी पहिला व्हिडिओ

हाजी करम यांचा हा व्हिडिओ हजारो लोकांनी पहिला आहे. अनेकांनी त्यांच्या व्हिडिओला लाईक केले आहे. कॉमेंटचा पाऊस त्या व्हिडिओवर पडत आहेत. काहींनी काश्मीरमधील परिस्थिती कशी बदलली, हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. एक युजर म्हणतो, हे आहे नवे काश्मीर. दुसरा एक जण म्हणतो, हाजीसाहब जीवनाचा खरेखरा आनंद लुटत आहे. एकाने तर त्यांना महेंद्रसिंह धोनीची उपमा दिली आहे. एका नेटकऱ्याने बीसीसीआयने वरिष्ठ लोकांसाठी क्रिकेट स्पर्धा सुरु करावी, अशी मागणी केली आहे.

हाजी करम यांनी मतदानाचा हक्क बजावला

हाजी करम यांनी आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले आहे. लोकसभा निवडणुकीत त्यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. त्यांनी स्वत: मतदान करत इतरांनाही मतदानासाठी प्रवृत्त केले आहे. जम्मू-काश्मीरमध्येही लोकसभा निवडणुकीसाठी मतदान शांततेत पार पडले.