मगरींच्या जबड्यात खूप ताकद असते. तो सर्वात मोठ्या प्राण्याची हाडे सुद्धा खाऊ शकतात. आता असं जर तुम्हाला माहित असेल तर अशा परिस्थितीत मगरीच्या जबड्यात हात घालण्याची कुणाची हिंमत कोण करेल ना? पण काही लोक असतात असे ज्यांना असं धाडस करण्यात मजा वाटते. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यामध्ये एक व्यक्ती हा पराक्रम करताना दिसतोय. तो निर्धास्तपणे मगरीच्या तोंडात हात घालतो. पण जबड्याच्या मध्ये हात फिरवताच मगर ज्या वेगात तोंड बंद करते…बापरे!
हा धक्कादायक व्हिडिओ 13 डिसेंबर रोजी इन्स्टाग्राम पेजवर animals_powers शेअर करण्यात आला होता. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले – शेवटाची वाट बघा.
या क्लिपला आतापर्यंत 1 लाख 98 हजार व्ह्यूज आणि 5 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तसेच, सर्व युझर्सनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
एका यूजरने लिहिले अशा लोकांना मूर्ख म्हणणे चुकीचे ठरणार नाही. त्याने शेवटच्या हालचालीवर मगरीच्या जबड्यापासून आपला हात ज्या प्रकारे वाचवला होता त्यावर इतरांनी त्या माणसाच्या आत्मविश्वासाची प्रशंसा केली.
या क्लिपमध्ये आपण पाहू शकतो की, एक माणूस मगरीच्या मागच्या बाजूला बसलेला आहे. मगरीने आपला जबडा उघडला आहे,आजूबाजूला उपस्थित असलेले लोक त्या माणसाचे धाडसी कृत्य पाहत आहेत.