मुंबई : अनेकदा विचित्र घटना सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होतात. आताही अशीच एक घटना समोर आली आहे. जी प्रचंड प्रमाणात व्हायरल होत (Viral News) आहे. त्याची सोशल मीडियावर तुफान चर्चा होत आहे. यात एक व्यक्ती आहे. ज्याने जिवंत सापाचे तुकडे केलेत. तेही सूप बनवण्यासाठी… पण साप तो शेवटी सापच त्याचे तुकडे केल्यानंतरही त्यांने आपला मूळ स्वभाव सोडला नाही. सापाचे तुकडे केल्यानंतरही सापाने पुढच्या 20 मिनिटात या व्यक्तीला जोरदार चावा घेतला. अन् त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना चीनमधील आहे. चीनमधील एक रेस्टॉरंट सापाच्या सूपसाठी प्रसिद्ध आहे. तिथे असं विचित्र सूप बनवलं जातं. पण तिथे नेहमीचं काम करताना, सापाचे तुकडे करताना एका शेफला सापाने चावलं अन् त्याचा मृत्यू झाला. या अपघाताची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. यात त्याला आपला जीव गमवावा लागला.
एका घटनेची सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चा आहे. त्याची सोशल मीडियावर तुफान चर्चा होत आहे. यात एक व्यक्ती आहे. ज्याने जिवंत सापाचे तुकडे केलेत. तेही सूप बनवण्यासाठी… पण साप तो शेवटी सापच त्याचे तुकडे केल्यानंतरही त्यांने आपला मूळ स्वभाव सोडला नाही. सापाचे तुकडे केल्यानंतरही सापाने पुढच्या 20 मिनिटात या व्यक्तीला जोरदार चावा घेतला. अन् त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना चीनमधील आहे.
चीनमधील एका रेस्टॉरंटमध्ये काम करणारा शेफ पेंग फॅन इंडोचायनीज स्पिटिंग सापाच्या मांसापासून सूप बनवत होता. यासाठी त्याने सापाचे तुकडे केले होते आणि त्याचे डोके कापून बाजूला ठेवले होते. सूप बनवण्यासाठी त्यांना 20 मिनिटं लागली. यानंतर त्याने किचन साफ करण्यास सुरुवात केली. जेव्हा त्याने सापाचं कापलेलं डोके फेकून देण्यासाठी उचलले तेव्हा सापाने शेफचा चावा घेतला. यानंतर डॉक्टरांना बोलावण्यात आलं मात्र डॉक्टर येण्यापूर्वीच शेफचा मृत्यू झाला होता.
तज्ज्ञांच्या मते, ही एक दुर्मिळ घटना आहे. साप त्यांना मारल्यानंतर किंवा त्याचे तुकडे केल्यानंतर एक तासापर्यंत जिवंत राहू शकतो. त्यामुळे अश्या गोष्टी करताना सावध राहणं गरजेचं आहे.