मुंबई : सध्या सोशल मीडियावर विविध व्हीडिओ व्हायरल होत असतात. यात प्राणी आणि चिमुकल्यांची दोस्ती तर सोशल मीडियावरचा चर्चेचा विषय. सध्या असाच एक चिमुकला आणि त्याच्या दोस्ताचा म्हणजेच एका कुत्र्याचा व्हीडिओ (little boy and dog viral video) सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हीडीओ खूपच क्युट आणि भावनिक आहे, त्यामुळे हा व्हीडिओ सध्या चर्चेचा विषय बनला आहे. यात या दोघांचं बॉन्डिंगही दिसून येतंय. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हीडिओमध्ये एक कुत्रा रस्त्यावर भिंतीला टेकून बसलेला दिसत आहे. त्याच्या समोर एक लहान मुलगा आहे. या मुलाने त्याचा हात या कुत्र्याच्या पुढे केला. पण त्यावर कुत्रा लगेच रिअॅक्ट झाला नाही. थोडा वेळ घेत पुढच्या क्षणी त्याने त्याच पंजा या चिमुकल्यापुढे केला. हा लहानगा खुश झाला त्याने तो पंजा हातात घेतला. अन् त्यावर किस केलं. त्यांचा हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत (viral video) आहे.
सध्या एक चिमुकला आणि त्याच्या दोस्ताचा म्हणजेच एका कुत्र्याचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हीडीओ खूपच क्युट आणि भावनिक आहे, त्यामुळे हा व्हीडिओ सध्या चर्चेचा विषय बनला आहे. यात या दोघांचं बॉन्डिंगही दिसून येतंय. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हीडिओमध्ये एक कुत्रा रस्त्यावर भिंतीला टेकून बसलेला दिसत आहे. त्याच्या समोर एक लहान मुलगा आहे. या मुलाने त्याचा हात या कुत्र्याच्या पुढे केला. पण त्यावर कुत्रा लगेच रिअॅक्ट झाला नाही. थोडा वेळ घेत पुढच्या क्षणी त्याने त्याच पंजा या चिमुकल्यापुढे केला. हा लहानगा खुश झाला त्याने तो पंजा हातात घेतला. अन् त्यावर किस केलं. त्यांचा हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
Twitter needs this.. ? pic.twitter.com/RHMuDH5pSu
— Buitengebieden (@buitengebieden) May 20, 2022
हा व्हीडिओ buitengebieden या ट्विटर अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. याला आतापर्यंत 17 लाखांहून अधिक लोकांनी पाहिलं आहे. तसंच 58 हजारांहून अधिकांनी याला लाईक केलंय.