स्वतःच्याच मुलीला boyfriend बनून केला मेसेज, पोलिसांनी पकडल्यावर सांगितलं धक्कादायक कारण

| Updated on: Dec 26, 2022 | 3:52 PM

सुरुवातीला यात मुलीच्या आईचाच हात आहे, याचा पोलिसांना संशय आला नाही.

स्वतःच्याच मुलीला boyfriend बनून केला मेसेज, पोलिसांनी पकडल्यावर सांगितलं धक्कादायक कारण
Online messages
Image Credit source: Social Media
Follow us on

ऑनलाइन आणि माहिती तंत्रज्ञानाने ज्या सोप्या गोष्टी निर्माण केल्या आहेत, त्यात काही वेळा त्याचे तोटेही समोर येतात. अलिकडेच एका महिलेला अटक करण्यात आली. या महिलेवर गेल्या एक वर्षापासून स्वतःच्या मुलीचा छळ केल्याचा आरोप होता. ती आपल्या मुलीचा प्रियकर म्हणून मेसेज करत होती. दरम्यान आईनेही हे सगळं मान्य केलंय. ही अतिशय धक्कादायक बाब आहे.

वास्तविक ही घटना अमेरिकेतील मिशिगन मधील आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आरोपी महिला 42 वर्षांची असून तिचे नाव कांद्रा गेल लिकारी आहे.

या महिलेवर स्वतःच्या मुलीला ऑनलाइन शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. मुलगी भीतीपोटी ना आपल्या घरच्यांना ही गोष्ट सांगत होती ना कोणत्याही मैत्रिणीला सांगत होती. शेवटी तिने ही गोष्ट तिच्या आईला सांगितली.

या मुलीने जेव्हा आपल्या आईला सांगितलं तेव्हा तिच्या आईने सुद्धा आपण काही न केल्याचं भासवलं. आपण असं पोलिसांकडे तक्रार करूयात असं म्हणत दोघींनी पोलीस स्टेशन गाठलं, सगळा किस्सा सांगितला.

सुरुवातीला यात मुलीच्या आईचाच हात आहे, याचा पोलिसांना संशय आला नाही. पण तपास सुरू झाल्यावर हळूहळू हे प्रकरण उघडलं गेलं.

मुलीने जेव्हा ऐकले की हे सर्व तिच्या आईने केले आहे, तेव्हा तिचा आधी विश्वास बसला नाही, मग नंतर आईने हा पराक्रम स्वीकारला. त्याने असे का केले याचे कारणही त्यांनी दिले.

गेल्या एक वर्षापासून आपण हे करत असल्याचंही आरोपी महिलेनं सांगितलं आणि एक अतिशय विचित्र कारण सांगितलं. ती म्हणाली की, ती इतर कोणालाही बळी पडू नये म्हणून ती तिला या गोंधळात टाकत असे. सध्या मुलीच्या आईला अटक करण्यात आली आहे.