सोशल मीडियावर तुम्ही अनेक व्हिडिओ पाहिले असतील, पण हा व्हायरल व्हिडिओ पाहून तुमचं मन नक्कीच प्रसन्न होईल. व्हायरल व्हिडिओमध्ये एक व्यक्ती बदतमीज दिल या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. हा व्यक्ती दुसरा कोणी नसून नवरदेवाचे वडील आहेत. हा व्हिडिओ त्या व्यक्तीच्या मुलाच्या लग्नाचा असल्याचा दावा केला जात आहे. या व्हायरल व्हिडिओला सोशल मीडियावर भरभरून प्रेम मिळत आहे. नवरदेवाच्या वडिलांच्या बदतमीज दिल गाण्यावरील डान्स युजर्सना खूप आवडत आहे. या व्हायरल व्हिडिओवर युजर्सनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
नवरदेवाच्या वडिलांचा डान्स करतानाचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. नवरदेवाच्या वडिलांचा डान्स करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. वडील वयोवृद्ध असले तरी नाचताना ऊर्जेची कमतरता भासत नाही. यावेळी आपल्याला चिअर करणाऱ्या लोकांचा आवाजही व्हिडिओमध्ये ऐकू येतो.
नवरदेवाच्या वडिलांच्या डान्सचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे. या व्हायरल व्हिडिओला आतापर्यंत 1 लाखांहून अधिक युजर्सनी लाइक केले आहे. डान्सच्या या व्हायरल व्हिडिओवर मोठ्या संख्येने लोकांनी कमेंटही केल्या आहेत.
सोशल मीडियावर प्रतिक्रिया देताना एका युजरने कमेंट केली की, प्रत्येकाच्या वडिलांनी असा आनंद घ्यावा अशी माझी इच्छा आहे. तर गीतिका नावाच्या एका युजरने लिहिले की, त्यांच्या एनर्जी लेव्हलला सलाम.
तर दुसऱ्या एका युजरने नवरदेवाच्या वडिलांच्या डान्स व्हिडिओवर प्रतिक्रिया देत लिहिलं की, ” देवा! मी आतापर्यंत पाहिलेल्या सर्वोत्कृष्ट डान्स पैकी हा एक डान्स आहे.