मुंबई : बऱ्याच वेळा सोशल मीडियाच्या जगातून अनेक विचित्र व्हिडीओ समोर येत असतात, जे पाहून आपल्याला धक्का बसू शकतो. आजकाल असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्ही नक्कीच विचार करायला भाग पडल की हे कसे घडले? खरं तर, आम्ही आज ज्या व्हिडीओबद्दल बोलत आहोत, त्यामध्ये एक स्कूटी दिसत आहे, पण एक अतिशय धोकादायक साप असणारा किंग कोब्रा त्याच्या स्कूटीच्या हँडलमध्ये लपलेला दिसत आहे.
आता अशी कल्पना करा ही स्कूटी चालवण्यासाठी कोणी तरी त्यावर बसले असते, तर पुढे काय झाले असते. तो त्याच्या आयुष्याला मुकला असता, हे उघड आहे. पण सुदैवाने कोणीतरी आधीच हा कोब्रा तिथे पाहिला होता. त्यानंतर त्याला स्कूटीच्या हँडलमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू झाला. या घटनेचा व्हिडीओ तिथे उपस्थित असणाऱ्या कोणीतरी आपल्या कॅमेऱ्यात कैद केला होता. जो आता सोशल मीडियाच्या जगात झपाट्याने शेअर केला जात आहे.
And from the twitter account of the irrepressible @susantananda3 an amazing post
Unusual way of rescuing a cobra;as @susantananda3 says “never try this ever”
Absolutely Awesome!@wildsaba @PraveenIFShere @pargaien @drqayumiitk @surenmehra @AnkitKumar_IFS
pic.twitter.com/3U0khMxyuJ— Rajiv Kunwar Bajaj (@rkbnow) September 7, 2021
या व्हिडिओमध्ये साप आरशाच्या बाजूने आत गेल्याचे स्पष्ट दिसत आहे. मग थोड्या वेळाने स्कूटीच्या हँडलमधून एक मोठा कोब्रा साप बाहेर येतो. खरं तर एक व्यक्ती स्कूटीच्या हँडलमधून हा साप बाहेर काढतो. आजूबाजूला उभे असलेले लोक सादर घटनेचा व्हिडिओ बनवू लागतात. यानंतर, साप देखील बचावकर्त्यावर हल्ला करतो. तर, हा हल्ला पाहून जवळच उभे असलेले लोक घाबरतात.
दरम्यान, एक माणूस लोकांना सांगतो की कोणीही ओरडू नये आणि तो सापाला पाण्याच्या मोठ्या बाटलीत टाकण्याचा प्रयत्न करतो. पण कोब्रा अचानक त्याच्यातून बाहेर येतो. बरं, कसे तरी सापाची सुटका होते. परंतु हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक असे म्हणत आहेत की, सापांपासून दूर राहणेच चांगले आहे, अन्यथा अनेक वेळा एखाद्या व्यक्तीला त्याच्या चुकीचे फटका सहन करावा लागतो.
Video | ‘मानिके मगे हिते’ गाण्याची क्रेझ, हवाई सुंदरीचा विमानात झक्कास डान्स, व्हिडीओ व्हायरल