मुलाने आईला दिलं असं बर्थडे गिफ्ट, हार्ट अटॅक येता-येता राहिला; व्हिडीओ व्हायरल

| Updated on: Sep 11, 2023 | 6:11 PM

हा व्हायरल व्हिडीओ बघा, असे स्टंट तुम्ही चुकूनही करू नका. मुलाने आपल्या आईला असं गिफ्ट दिलंय की तुम्ही बघतच बसाल. हा व्हिडीओ इतकी उत्सुकता वाढवतो आणि त्यानंतर हे गिफ्ट बघितल्यावर मात्र सगळ्यांनाच धक्का बसतो. काय असेल बरं हे गिफ्ट?

मुलाने आईला दिलं असं बर्थडे गिफ्ट, हार्ट अटॅक येता-येता राहिला; व्हिडीओ व्हायरल
birthday gift to mother
Follow us on

मुंबई: एखाद्याचा वाढदिवस असेल तर तो उत्साहात साजरा केला जातो. वाढदिवस म्हटलं की पार्टी, उत्साह, जल्लोष प्रचंड! जवळच्या व्यक्तीचा वाढदिवस असेल तर विचारूच नका. त्यांना काय गिफ्ट द्यायचं काय नाही, कसा साजरा करायचा वाढदिवस अशा सगळ्या प्लॅनिंग मध्ये आपण व्यस्त होऊन जातो. सगळ्यात मोठी समस्या असते ती गिफ्टची! काय गिफ्ट द्यायला हवं हा खूप मोठा प्रश्न आपल्यापुढे असतो. आता समजा आईचा वाढदिवस असेल तर? आईला काय द्यावं हे एक मोठं कोडं असतं. तिला विचारलं तर ती, “माझ्याकडे सगळं आहे” असं म्हणून मोकळी होते. असं ऐकलं की आपल्याला आणखी प्रश्न पडतो आणि आपण गोंधळून जातो.

काय गिफ्ट असावं बरं?

हा व्हिडीओ बघा, यात एका मुलाच्या आईचा वाढदिवस असतो. आता आईचा वाढदिवस म्हणजे किती ती उत्सुकता, या आईसमोर मोठा बॉक्स ठेवलेला असतो. या बॉक्स मध्ये तिचं गिफ्ट असतं. तो तिला सांगतो बघ, बघ काय गिफ्ट आहे तर आधी ती आई विचार करते, “काय गिफ्ट असावं बरं?” व्हिडीओ बघता बघता प्रेक्षकांची देखील उत्सुकता वाढत जाते. काय वाटतं काय असेल या बॉक्समध्ये गिफ्ट?

आईवर प्रॅन्क

हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झालाय. याआधी सुद्धा तुम्ही वाढदिवसाचे अनेक व्हिडीओ पाहिले असतील पण हा व्हिडीओ जरा हटके आहे. सगळ्यात महत्त्वाचं या व्हिडिओमध्ये आईला जे गिफ्ट देण्यात आलंय ते तुम्ही देऊ नका नाहीतर तुम्हाला चांगलेच फटके मिळतील. आता तुम्ही व्हिडीओ पाहिलाच असेल, या व्हिडीओमध्ये बघा या बॉक्समध्ये साप आहे. होय! या मुलाने आपल्या आईला गिफ्टमध्ये साप दिलेला आहे. साप! हा साप बघताच आई प्रचंड घाबरते. त्याने त्याच्या आईवर प्रॅन्क केलेला आहे, हे स्वतः त्याने त्याच्या व्हिडीओला कॅप्शन देऊन म्हटलंय.