सोशल मीडियावर एका वडिलांचे खूप कौतुक होत आहे, ज्यांना लोकांनी ‘फादर ऑफ द इयर’ ही उपाधी दिली आहे. खरं तर शाळेच्या एका कार्यक्रमादरम्यान जेव्हा त्या व्यक्तीची मुलगी डान्स विसरायला लागली तेव्हा प्रेक्षकांमध्ये बसलेले वडील स्वत: नाचले आणि आपल्या मुलीला डान्स स्टेप्सची आठवण करून दिली. या क्षणाने सोशल मीडियावर अनेकांची मने जिंकली आहेत. हा व्हिडिओ 24 सेकंदाचा आहे, ज्यात आपण स्टेजवर निरागस मुलांचा एक गट नाचताना पाहू शकतो. एक मुलगी डान्स स्टेप्स विसरायला लागते. अशावेळी प्रेक्षकांच्या मधोमध बसून तिचे वडील स्वत: नाचतात आणि मुलीला डान्स स्टेपची आठवण करून देतात. मग पप्पांना पाहून मुलगी आपला डान्स पूर्ण करू लागते. प्रेक्षकांमध्ये बसलेल्या कुणीतरी हे दृश्य टिपले. स्टेजवर उपस्थित असलेल्या मुली दलेर मेहंदी यांच्या ‘टुनक-टुनक तुन’ या प्रसिद्ध गाण्यावर डान्स करत होत्या.
कोट्यवधी लोकांच्या हृदयाला स्पर्श करणारा हा व्हिडिओ आयपीएस दीपांशू काबरा यांनी 7 फेब्रुवारी रोजी ट्विटरवर पोस्ट केला आणि लिहिले- आणि ‘फादर ऑफ द इयर’ पुरस्कार मिळाला.
And the #FatherOfTheYear Award goes to… ? pic.twitter.com/iqDyp4Fqkr
— Dipanshu Kabra (@ipskabra) February 7, 2023
या क्लिपला 7 लाख 2 हजारांहून अधिक व्ह्यूज आणि 66 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तसेच शेकडो युजर्सनी त्यावर कमेंट्स केल्या. काहींनी लिहिलं “या व्हिडिओने त्यांचा दिवस बनवला”, दुसरा म्हणाला डॅडीसारखा कोणीच नाही. आपल्या मुलीसाठी नेहमीच सर्वोत्कृष्ट चीअर लीडर. माझे वडील माझ्या छोट्याशा कर्तृत्वावर नेहमीच अभिमानाने हसत असत. तर आणखी एका युजरने लिहिले की, म्हणूनच मुली ‘पापा की परी ” असतात.