मुंबई: सोशल मीडियावर लोक नाचताना आणि आपलं टॅलेंट दाखवतानाचे अनेक व्हिडिओ आहेत. त्यापैकी काही इतके आश्चर्यकारक आहेत की आपल्याला त्यांना पुन्हा पुन्हा पहायला आवडते. दरम्यान, एका महिलेचा तिच्या आजे सासऱ्यांसमोर नाचतानाचा व्हिडिओ इंटरनेटवर चांगलाच चर्चेत आहे. या व्हिडिओमध्ये ही महिला 1974 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बिदाई’ चित्रपटातील ‘कभी खोले ना तिजोरी का ताला’ या सुपरहिट गाण्यावर डान्स करताना दिसत आहे, तर आजे सासरे मागच्या बेडवर बसलेले आहेत. हा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे.
अदिती कर्मा असं या व्हिडिओत दिसणारी महिला आहे. तिच्या इन्स्टा प्रोफाईलवरून ती ब्लॉगर असल्याचे दिसून येते. अदितीने व्हिडिओत दिसणाऱ्या वृद्ध व्यक्तीचे वर्णन आपले ‘आजे सासरे’ असे केले आहे. व्हायरल क्लिपमध्ये अदिती पिवळ्या रंगाच्या साडीत अतिशय सुंदर दिसत आहे. किशोर कुमार यांच्या ‘कभी खोले ना तिजोरी का ताला’ या हिट गाण्यावर तो अतिशय क्यूट स्टाईलमध्ये डान्स करताना दिसत आहे. तर मागच्या बाजूला बसलेले आजे सासरे हसून तिच्याकडे पाहतायत. या रीलवरून सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. त्याआधी हा व्हिडिओ पाहा.
अदितीने 8 एप्रिल रोजी @vickyaditi_official तिच्या इन्स्टा अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे, ज्याला आतापर्यंत 66 हजारांहून अधिक लोकांनी लाइक केले आहे. तर 10 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. मात्र ही क्लिप पाहून लोकांमध्ये एक नवा वाद उफाळून आला आहे.
बहुतांश युजर्सनी आदितीच्या टॅलेंटचं कौतुक केलं आहे. तर काही लोक असे ही आहेत जे असे मानतात की सासरच्यांसमोर असे नाचणे योग्य नाही. मग ते तुमचे आजे सासरे असले तरी. याशिवाय काही युजर्सना त्यांच्या आजोबांची आठवण झाली.