Love Affair | न उमर की सीमा हो, न जनम का हो बंधन; जब प्यार करे कोई, तो देखे केवल मन; नई रीत चलाकर तुम, ये रीत अमर कर दो… गजल सम्राट जगजीत सिंह यांच्या गाण्याचे हे शब्द काहीजण तंतोतंत अमलात आणतात. काही प्रेमी जोडप्यांना आपल्या प्रेमासमोर काही दिसत नाही. त्यांच्यासमोर कुठलीही सीमा किंवा बंधन नसतं. ते फक्त प्रेम करतात. त्यांच्याप्रेमासमोर समाजाला झुकाव लागतं. असच एक प्रकरण बिहारच्या गोपाळगंजमध्ये समोर आलय.
4 फेब्रुवारीला रविवारी संध्याकाळी गोपाळगंजच्या भोरे पोलीस ठाण्यात लोकांची मोठी गर्दी जमली होती. एक प्रेमी जोडप परस्परासोबत लग्न करण्यासाठी हट्टाला पेटलं होतं. काही लोक त्यांचा विरोध करत होते. महिला चार मुलाची आई आहे. सहा महिन्यापूर्वी तिच्या नवऱ्याचा मृत्यू झाला. त्यानंतर ती सासऱ्याच्या प्रेमात पडली. दोघांच प्रेम इतक वाढल की, त्यांनी समाजाचा विचार न करता लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण नेहमीप्रमाणे समाज आणि कुटुंब त्यांच्या प्रेमात दुश्मन बनून समोर आलं. त्यांच्या लग्नाला विरोध केला.
पोलिसांची काय भूमिका होती?
समाजाच भय दाखवून नातेवाईक तिला या लग्नापासून रोखण्याचा प्रयत्न करत होते. वाद वाढत गेला. लोक पोलीस ठाण्यातमध्ये आले. पोलीस अधिकाऱ्यांनी दोघांना भरपूर समजावलं. समाज काय म्हणेल? हे भय त्यांना दाखवलं. पण दोघेही आपल्या निर्णयावरुन इंचभरही ढळले नाहीत. अखेर पोलीस स्टेशनमध्ये त्यांच लग्न लावण्यात आलं. पोलीस ठाण्यात मंदिरात दोघांनी एकमेकांच्या गळ्यात वरमाला घातली. त्यानंतर सासऱ्याने सूनेच्या डोक्यात सिंदूर भरुन आयुष्यभरासाठी तिला आपलं केलं.
त्यावेळी सासरे तिच्या आयुष्यात आले
महिलेच्या पतीचा सहा महिन्यापूर्वी ट्रेनमधून पडून मृत्यू झाला. यानंतर पत्नी सीमा देवी विधवा झाली. पदरात चार मुलं असल्याने सगळी जबाबदारी त्याच्यावर आली. ती सर्व बाजूंनी एकटी पडली होती. त्यावेळी सासरे तिच्या आयुष्यात आले. त्यांनी सगळी जबाबदारी उचलली. या दरम्यान दोघे परस्पराच्या प्रेमात पडले.