Viral video father-daughter marriage claim: बाप-लेकीच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. एका 24 वर्षांच्या मुलीने 50 वर्षांच्या बापासोबत लग्न केले आहे. या घटनेमुळे सर्वांना मोठा धक्का बसला आहे. त्यासंदर्भात व्हिडिओ बनवून त्यांनी शेअर केला आहे. त्यामुळे या घटनेला घोर कलियुग शिवाय काय म्हणावे? अशा प्रतिक्रिया युजर देत आहेत. यासंपूर्ण व्हिडिओत बोलताना त्या बाप-बेटीने निर्लज्जपणाचा कळस गाठला आहे.
‘टीव्ही ९ मराठी’ या व्हायरल व्हिडिओला दुजोरा देत नाही. या व्हिडिओत मुलगी म्हणते, हे माझे वडील आहे आणि मी त्यांच्याशी लग्न केले आहे. समाज आमच्या नात्याला मान्यता देणार नाही. परंतु आम्ही लग्न केले आहे, कोणी आमचे नाते मान्य करावे किंवा नाही? त्याच्याशी आम्हाला काहीच घेणे देणे नाही. जेव्हा वडिलांना विचारले जाते, काय ही तुमची मुलगी आहे? ते होकारार्थी उत्तर देत, यामध्ये अडचण काय आहे? असा प्रश्न विचरतात. वडिलांशी लग्न करताना तुला लाज नाही वाटली? असा प्रश्न त्या मुलीला विचारला. त्यावेळी मुलीचे वडील म्हणतात, तुम्ही कोणत्या जगात राहत आहे? कशाला लाज वाटायची?
मुलीला वय विचारल्यावर ती 24 वर्षांची असल्याचे सांगते. तिचे वडिलांनी त्यांचे वय 50 वर्ष असल्याचे म्हटले आहे. व्हिडिओ बनवण्याचे कारण विचारले असता, आम्हाला जगाला सांगायचे आहे, असे उत्तर मुलीने दिले. कारण आमच्या मागे लोक अनेक चर्चा करत असतात. जयसिंग यादव यांनी X वर हा व्हिडिओ शेअर केला आहे. जो व्हायरल होत आहे. ही TikTok ची क्लिप आहे. यामुळे हा व्हिडिओ खरा की खोटा? असा प्रश्न आहे.
एक बेटी ने अपने बाप से शादी कर ली और बाप ने अपनी बेटी से शादी कर ली।
हिंदू रीति रिवाज के अनुसार सादी मंदिर में संपन्न हुई उसके बाद मीडिया से बात की किसी को अब दिक्कत नहीं होनी चाहिए दोनों सहमत हैं दोनों राजी हैं। pic.twitter.com/cSY6Yytcv5
— Jaysingh Yadav SP (@JaysinghYadavSP) November 27, 2024
अनेक युजरने हा व्हिडिओ खोटा असल्याचे सांगत मनोरंजनासाठी बनवल्याचे म्हटले आहे. जर हा व्हिडिओ खरा असेल तर अशा लोकांना मानसिक उपचाराची गरज आहे, असे काही युजरने म्हटले आहे. वडील आपल्या मुलीसोबत लग्न कसे योग्य ठरवू शकतात? असा प्रश्न उपस्थित केला आहे.
दरम्यान, हा व्हिडिओ खरा असेल तर भारतीय कायद्यानुसार हा गुन्हा आहे. भारतीय दंड संहिता आणि हिंदू विवाह कायद्यानुसार वडील आणि मुलगी यांच्यात लग्न होऊ शकत नाही. त्यामुळे त्यांना शिक्षा होऊ शकते.