मुंबई: एखाद्या व्यक्तीला आदर मिळवायचा असेल तर त्याने इतरांचा आदर केला पाहिजे. एखाद्याला आदराने वागायला सांगायचं असेल तर स्वतःही आधी ते करून दाखवावं ही म्हण माणसांमध्येही बरीच प्रसिद्ध आहे. प्राण्यांचा सन्मान केला तर त्या बदल्यात ते सन्मानही देतात, असा विचार तुम्ही कधी केला आहे का? आम्ही असाच एक व्हिडिओ घेऊन आलो आहोत जो तुम्हाला विचार करायला भाग पाडेल. हा व्हिडिओ एका लहान मुलीचा आणि हरणाचा आहे, जो पाहून लोकं आश्चर्यचकित झाले आहे.
व्हिडिओमध्ये दिसत आहे की, कुंपणाच्या एका बाजूला हरीण आहे आणि दुसऱ्या बाजूला हरणासमोर एक लहान मुलगी उभी आहे. मुलगी अन्न घेते आणि हरणाच्या दिशेने हात पुढे करते. खाल्ल्यानंतर हरिणही मुलीला मान झुकवून प्रतिसाद देते. यानंतर मुलगी हरणाला काहीतरी भरवते. हरीण सुद्धा अगदी आनंदाने ते चघळायला लागतो. मुलगी पुन्हा डोकं झुकवते आणि हरण सुद्धा तेच करते. हरीण त्या मुलीप्रमाणेच वागते. तुम्हाला जर कुणाकडून कसली अपेक्षा असेल तर तुम्हीही आधी तीच गोष्ट करावी हे फक्त आपण ऐकत आलोय पण हा व्हिडीओ पाहिल्यावर त्याची प्रचिती येते.
इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडिओने इंटरनेटवर धुमाकूळ घातला असून, अनेक युजर्सने हरणावर तसेच चिमुकलीवर प्रेम व्यक्त केले आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर एका युजरने कमेंट केली, “वाह सो क्यूट.” दुसऱ्याने लिहिले,” परदेशी लोक लहान मुले आणि प्राण्यांना आदर शिकवतात, तर इथे आपण मजेशीर व्हिडिओच्या नावाखाली मुलांना वडील, वृद्ध यांचा अनादर करायला शिकवत आहोत.”