नुकताच एका हरणाचा व्हिडिओ व्हायरल झाला, ज्यामध्ये त्याने रस्ता ओलांडताना लांब लांब उडी घेतलीये. हा एका छोट्या हरणाचा जबरदस्त व्हिडिओ आहे. ज्यामध्ये तो रस्ता ओलांडताना रस्त्यावर वाहतूकही दिसून येतीये. पण एवढी वाहतूक बघून लोकं बघून तो घाबरत नाही. चपळाईने तो इतकी लांब उडी मारतो की बस्स! हा व्हिडिओ अनेक युझर्सनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.
वन विभागाचे अधिकारी सुसंता नंदा यांनी आपल्या ट्विटर हॅण्डलवर शेअर करत लिहिले की, ‘ओह डियर, यह तो जंप ऑफ लाइफ है’.
Ohh dear deer ☺️☺️
Jump of the life pic.twitter.com/SSb5Rwrqs4— Susanta Nanda (@susantananda3) October 4, 2022
व्हिडिओमध्ये दिसत आहे की, हा छोटा हरीण रस्त्याच्या कडेला असलेल्या भागातून वेगाने येतो आणि टनकण उडी मारतो. रस्त्यावरील वाहतूक दिसते तरीसुद्धा तो लांब उडी मारतो.
रस्ता ओलांडून दुसऱ्या दिशेने जाणारी उडी इतकी लांब असते की ते हरीण काहीच क्षणांत रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला पोहचतं.
रस्त्यावरील लोकं तर अक्षरशः बघतच बसतात. सध्या हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. रस्त्यावरील एका प्रवाशाने हा व्हिडिओ आपल्या कॅमेऱ्यात कैद केलाआणि आता तो अधिकाधिक व्हायरल होत आहे.
एका युझरने लिहिले की, आज ते पाहणे हा माझा दिवस झाला आहे. हा खूप छान व्हिडिओ आहे. मात्र, एका युझरने कमेंट केली की, “सुदैवाने याचा फटका कोणालाही बसला नाही. दुसऱ्याने लिहिले की, ते उडत आहे.