Viral Video | दिल्लीतील ‘त्या’ वृद्ध व्यक्तीच्या बासरीचे सूर ऐकून सगळेच भारावले, म्हणाले…

| Updated on: Oct 09, 2021 | 8:36 AM

प्रत्येकामध्ये काही ना काही प्रतिभा असते. प्रतिभा दाखवण्यासाठी वयाची कुठलीही मर्यादा नसते, ज्यामुळे अनेक वेळा असे व्हिडीओ व्हायरल होतात. हे व्हिडीओ पाहून अनेकांना आश्चर्य वाटते. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात एक वयस्कर माणूस बासरी वाजवताना दिसत आहे.

Viral Video | दिल्लीतील त्या वृद्ध व्यक्तीच्या बासरीचे सूर ऐकून सगळेच भारावले, म्हणाले...
flute
Follow us on

मुंबई : प्रत्येकामध्ये काही ना काही प्रतिभा असते. प्रतिभा दाखवण्यासाठी वयाची कुठलीही मर्यादा नसते, ज्यामुळे अनेक वेळा असे व्हिडीओ व्हायरल होतात. हे व्हिडीओ पाहून अनेकांना आश्चर्य वाटते. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात एक वयस्कर माणूस बासरी वाजवताना दिसत आहे. हा व्हिडीओ सर्व सोशल मीडिया वापरकर्त्यांच्या खूप पसंतीस पडत आहेत. तसेच, लोक त्यांच्या प्रतिक्रिया शेअर करत आहेत. हिमांशी कुकरेजा यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम पेजवर हा व्हिडिओ शेअर केला आहे.

व्हिडिओमध्ये दिसते की ही वृद्ध व्यक्ती नवी दिल्लीतील कनॉट प्लेस परिसरात (Connaught Place area in New Delhi) बसून बासरी वाजवत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हीही वृद्ध व्यक्तीच्या बासरीच्या गोड संगीताने मंत्रमुगद्ध व्हाल. हा व्हिडीओ प्रत्येकाचे मन जिंकत आहे. वृद्धांच्या बाजूला एक फलक लावलेलाही दिसतो. ज्यात लिहिले आहे, ‘मला फक्त संगीताच्या मदतीने तुमच्या आत्म्याला स्पर्श करायचा आहे.’

हा व्हिडीओ शेअर करताना हिमांशीने कॅप्शनमध्ये लिहिले, ‘हा वृद्ध माणूस सीपीच्या आतील सर्कलमध्ये बसून स्वतःच्या आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी कमवण्याचा प्रयत्न करत होता. त्याने वाजवलेली बासरी इतकी सुखदायक आणि शांत होती की यामुळे मी तिथे थांबण्यापासून स्वत:ला रोखू शकले नाही. त्याच्या प्लेकार्डमध्ये लिहिले आहे की तो आपल्या आत्म्याला स्पर्श करण्यासाठी संगीत वाजवतो आणि नेमके हेच घडले. मला फक्त एवढेच हवे आहे की सीपीला येणारे लोक त्या ठिकाणच्या लोकांची मदत करू शकतील.

या व्हिडीओवर आतापर्यंत हजारो लाईक्स आल्या आहेत, सोबतच बऱ्याच कमेंट्स देखील दिसत आहेत. एका वापरकर्त्याने लिहिले – वास्तविक प्रतिभेचा पाठपुरावा केला पाहिजे. दुसऱ्याने लिहिले – खूप सुंदर संगीत. याशिवाय, इतर वापरकर्ते इमोटिकॉन्स शेअर करून प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

 

संबंधित बातम्या :