नवी दिल्ली: दिल्ली मेट्रोचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी कुणी भुताचे कपडे घालून या मेट्रो मध्ये शिरतं, तर कुणी डान्स करत बसतं. मेट्रोमध्ये प्रवास करणाऱ्या लोकांचा या सगळ्या गोष्टींना विरोधही तितकाच आहे आणि न बोलता समर्थन सुद्धा तितकंच आहे. व्हिडीओ मात्र काहीही असलं तरी लगेच व्हायरल होतात. दोन दिवसांपूर्वी एक व्हिडीओ व्हायरल झाला होता ज्यात एक मुलगी बिकिनी घालून प्रवास करताना दिसून आली. एका महिलेनेच या बिकिनी वाल्या मुलीचा व्हिडीओ शेअर केला आणि म्हटलं, “हेच का महिला सक्षमीकरण?”. यावर प्रतिक्रियांचा पाऊस पडला. कुणी विरोध केला, कुणी समर्थन. या बिकिनी वाल्या मुलीचे व्हिडीओ, फोटो प्रचंड व्हायरल झाले. आता या मुलीची प्रतिक्रियाच समोर आली आहे. काय वाटतं काय म्हणाली असेल ही मुलगी?
ही तरुणी जेव्हा माध्यमांशी बोलली तेव्हा तिची प्रतिक्रिया, “मला लोक काय म्हणतात याने काहीच फरक पडत नाही” अशीच होती. होय! माझ्या घरचेही जुन्याच विचारांचे असून त्यांनाही माझं असं वागणं फारसं आवडत नसल्याचं तिनं म्हटलं. तिला अशी फॅशन, असे कपडे घालायला आवडतात आणि ती व्हायरल व्हावं म्हणून हे सगळं करत नाही असंही म्हणाली. माध्यमांशी बोलताना ती म्हणाली की, मला काय घालायला आवडतं किंवा मला काय घालायचं आहे हे फक्त माझ्यावर अवलंबून आहे. मी कोणताही पब्लिसिटी स्टंट करत नाही किंवा प्रसिद्ध होण्यासाठी हे करत नाही. लोक माझ्याबद्दल काय विचार करतात हे मला महत्त्वाचे नाही.
अनेकांनी मुलीचे फोटो पाहिले आणि सांगितले की ती कदाचित उर्फी जावेदची नक्कल करत होती. मात्र यावर मुलीने मला उर्फीबद्दल माहिती नसल्याचे सांगितले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रिदम चनाना असं या मुलीचं नाव असून ती 19 वर्षांची आहे. माझे कुटुंबीयही यामुळे खूश नाहीत आणि यामुळे शेजारीही मला धमकावत आहेत. मला जे हवं ते मी घालते. लोक काय बोलतात याने काही फरक पडत नाही.
हे फोटो व्हायरल झाल्यानंतर डीएमआरसीनेही आपल्या निवेदनात म्हटले आहे की, प्रवाशांना सभ्य कपडे घालण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुलीने सांगितले की, मेट्रोमध्ये ट्रेनमध्ये व्हिडिओग्राफीसाठी कायदा आणि सुव्यवस्था नाही. जर त्यांना माझ्या कपड्यांबाबत काही प्रॉब्लेम असेल तर मेट्रोच्या आत व्हिडिओ बनवणाऱ्यां सोबतही सामान नियम असायला हवेत.
Another video of Delhi Metro.
If this is an example of WOMEN EMPOWERMENT, then alas our young generation GIRLS can be victim of such EMPOWERMENT ?♂️
And this is exactly what SHAMELESS FEMINISTS want.
I would call it CULTURAL GEN*CIDE.#delhimetro @OfficialDMRC pic.twitter.com/BrmjBQ3u32— Barkha Trehan ?? / बरखा त्रेहन (@barkhatrehan16) March 31, 2023
मीदेखील पुराणमतवादी कुटुंबातील आहे आणि माझ्या कुटुंबातील सदस्यांनाही यावर आक्षेप आहे, परंतु मला वाटते की हे माझे जीवन आहे, मला जे हवे ते मी करीन. मी अनेक महिन्यांपासून मेट्रोत प्रवास करत आहे. पिंक लाइनवर मला अनेकदा अडवलं गेलं आहे, पण बाकीच्या लाईनवर मी प्रवास करते. मला सुरक्षेबाबत कोणतीही अडचण नाही. मला आता लोकांच्या प्रतिक्रिया ऐकायची सवय झाली आहे.