नवी दिल्ली: सगळ्या गोष्टी एकीकडे आणि दिल्ली मेट्रो एकीकडे! दिल्ली मेट्रो मधल्या असंख्य गोष्टी व्हायरल होत असतात. कधी मेट्रो मध्ये कुणी मोंजोलीका बनून येतं तर कुणी बिकिनी काय घालून येतं. हळूहळू दिल्ली मेट्रोला एखाद्या मनोरंजनाचा स्पॉट म्हणून स्वरूप प्राप्त होतंय. ही मेट्रो आता कामाच्या गोष्टी सोडून इतर गोष्टींसाठीच जास्त प्रसिद्ध होऊ लागलीय. इतके व्हायरल व्हिडीओ बघून “दिल्ली मेट्रो” हे नाव दिसलं की त्यातल्या या विचित्र गोष्टी आठवतात. अनेकदा या व्हिडीओ वरून वाद सुद्धा होतात. व्हायरल व्हिडीओ बघून लोकं खाली कमेंट्स मध्ये आपलं मत मांडू लागतात. कुणी म्हणतं हे बरोबर आहे तर कुणी म्हणतं हे चूक आहे. कमेंट्स मध्येच लोकांची भांडणं सुरू होतात. असाच एक व्हिडीओ जबरदस्त व्हायरल होतोय. कोणता आहे हा व्हिडीओ ते पाहूया.
नुकतीच ट्विटरवर एक पोस्ट शेअर करण्यात आली होती, ज्यामध्ये दिल्ली मेट्रोच्या ट्रेनच्या डब्यात किस करतानाचा एक फोटो व्हायरल झाला होता. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 17 जून रोजी हुडा सिटी सेंटरच्या दिशेने जाणाऱ्या दिल्ली मेट्रोच्या yellow line वर T2C14 मध्ये ही घटना घडलीये. दिल्ली मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी ही पोस्ट बघून दखल घेतली आणि दोन दिवसांनंतर या पोस्टवर त्यांनी उत्तर दिले. उत्तर देताना DMRC म्हणाले, आम्ही गैरसोयीबद्दल खेद व्यक्त करतो. आम्ही या प्रकरणी चौकशी केली असता असे कोणतेही प्रवासी आढळले नाहीत.
Scenes at #DelhiMetro #yellowline adjacent to T2C14 towards HUDA City center @OfficialDMRC @DCP_DelhiMetro @DelhiPolice @ArvindKejriwal pic.twitter.com/A2N9LuVQDE
— Bhagat S Chingsubam (@Kokchao) June 17, 2023
या घटनेत सहभागी असलेले प्रवासी लगेचच मेट्रोच्या आवारातून बाहेर पडले असावेत आणि ते अधिकाऱ्यांना दाखवण्यासाठी दोन दिवस थांबले नसतील, असा टोला एक युजरने लगावला. हा प्रश्न सोडविण्यासाठी इतका वेळ लागल्याने DMRC वर जोरदार टीका करण्यात आली. DMRC जरी असे प्रश्न सोडवण्यात तत्पर असली तरी दिल्ली मेट्रो मधील अशा घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत आणि ही चिंतेची बाब आहे. असाच एक किसींगचा व्हिडीओ आधीही व्हायरल झाला होता ज्यात एक कपल मेट्रोमध्ये खाली झोपून किस करत होतं. सुरक्षा आणि नियम कडक करूनही अशी प्रकरणं वाढत असल्याचं दिसून येतंय.