नवी दिल्ली: दिल्ली मेट्रो एक चर्चेचा विषय आहे. एवढी कुठल्याही गोष्टीची चर्चा होत नसेल जेवढी दिल्ली मेट्रोची होते. सोशल मीडियावर या मेट्रोमधील व्हिडीओ खूप व्हायरल होतायत. दिल्ली मेट्रो मधील असे अनेक व्हिडीओ तुमच्या पाहण्यात आले असतील. कधी लोकं यात डान्स करतात, कधी गाणं म्हणतात, कधी तर फॅशन शो सुद्धा करतात. काही दिवसांपूर्वी तर नागपूर मेट्रोचा सुद्धा व्हिडीओ व्हायरल झाला होता ज्यात फॅशन वॉक करण्यात आला होता. दिल्ली मेट्रोच्या व्हायरल व्हिडीओने तर देशभरात धुमाकूळ घातलाय. प्रत्येक आठवड्यात या मेट्रोमधला एक व्हिडीओ व्हायरल होतो. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय पण हा जरा वेगळा आहे. वेगळा कसा? या व्हिडीओ मध्ये एक मुलगा व्हिडीओ बनवायला जातो पण तो फेल होतो.
हा मुलगा बघा, या मुलाला दिल्ली मेट्रोमध्ये स्टंट मारताना व्हिडीओ काढायचा होता म्हणजे तो व्हायरल होईल. पण तो स्टंट मारायला गेला आणि अपयशी ठरला. व्हिडीओ बघून तुम्हाला खूप हसू येईल. व्हिडिओमध्ये हा मुलगा बॅकफ्लिप मारण्याच्या तयारीत असतो, तो पोझ देतो आणि बॅकफ्लिप मारणार एवढ्यात तो डोक्यावर आदळतो. आधी तो इतका आत्मविश्वासाने स्टंट मारायला जातो त्याला बघताना आपल्यालाही वाटत नाही की तो डोक्यावर पडेल पण तो खूप जोरात पडतो. विशेष म्हणजे या व्हिडीओ मध्ये मागे जे प्रवासी बसलेले आहेत ते सुद्धा या मुलाच्या स्टंटकडे लक्ष देत नाहीत कदाचित दिल्ली मेट्रोचा हा नेहमीचाच प्रकार असल्यानं त्यांना लक्ष द्यावं असं वाटलंब नसेल.
chaman_flipper नावाच्या अकाउंटवरून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आलाय. हा व्हिडीओ दहा लाख लोकांनी पाहिलाय. 1 लाखापेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ लाईक केलाय. यावर खूप लोकांनी प्रतिक्रिया सुद्धा दिलेल्या आहेत. काही लोकं म्हणतायत, “भावा येत नाही तर कशाला स्टंट मारतोय, लागली ना वाट?”, एकजण कमेंट करून म्हणतोय, “ठीके, ठीके, जर स्टंट चांगला झाला असता तर इतका व्हायरल नसता झाला. एकाने लिहिलं, ‘खोपड़ी फटे तो फटे पर नवाबी ना घटे’. व्हिडीओ बघताना तुम्ही सुद्धा खूप हसाल, कारण आधी कुणालाच वाटत नाही की या व्हिडिओमध्ये पुढे असं काही होणारे.