Delhi Metro: दिल्ली मेट्रोतून (Delhi Metro) प्रवास करणं किती आव्हानात्मक असतं, हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. गर्दीत प्रवास तर करावा लागतोच, पण कधी कधी सीटसाठीही झगडावं लागतं. दिल्ली मेट्रोमध्ये जागा मिळवण्यासाठी लोक भांडताना तुम्ही पाहिले असतील, पण दिल्ली मेट्रोमध्ये बॅगा ठेवण्यासाठी भांडताना पाहिलंय का? होय, सोशल मीडियावर (Social Media) एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये दोन मुली आपापसात एका जागेसाठी भांडत आहेत. एकजण आरामदायी आसनावर बसलेली असताना दुसरी स्वत:साठी जागा शोधण्यासाठी धडपडताना दिसते आणि तिथूनच भांडणाला (Fight) सुरुवात होते.
व्हिडिओच्या सुरुवातीला पाहिल्याप्रमाणे, मेट्रोमध्ये प्रवेश केल्यानंतर एक महिला सीट शोधू लागते आणि या दरम्यान तिला एक सीट रिकामी असल्याचे दिसले पण जवळ बसलेल्या दोन महिलांनी आपल्या बॅगा सीटवर ठेवल्या. मुलीने बॅग काढण्यास सांगताच तिने बॅग काढण्यास नकार दिला. त्यावर उभ्या असलेल्या मुलीने मला बसायला जागा द्या असे सांगितले आणि सीटवर बसलेल्या महिलेने नकार देताच रागाने दुसऱ्या बाजूला जाऊन दुसऱ्या बाजूला जिथे जागाही नाही तिथे जाऊन बसली. काही सेकंदांचा हा व्हिडिओ इंटरनेटवर प्रचंड व्हायरल झाला.
“Nhi jagh hai – bout jagh hai”
Female Version ? pic.twitter.com/ePcJkHEAe8— Wellu (@Wellutwt) August 13, 2022
अपलोड केल्यापासून हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्याला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. एका ट्विटर युजरने कमेंट बॉक्समध्ये लिहिले की, “प्रत्येकजण भांडण पाहण्यात व्यस्त आहे, परंतु तिच्या शेजारी बसलेली मुलगी बर्गर खाण्यापूर्वी कचरा खाली फेकत असल्याचे कोणाच्याही लक्षात आले नाही.